भिवंडीत ब्रान्डेड कंपनीच्या नावाने बनावट शर्टाचे उत्पादन करणाऱ्या मालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:30 PM2018-10-17T22:30:33+5:302018-10-17T22:36:31+5:30

भिवंडी : शहर आणि परिसरांत रेडीमेड कपडे व ड्रेसेस बनविणा-या कंपनीचे मोठ्या संख्येने कारखाने असुन आर्थिक लालसेपोटी एका रेडीमेड ...

The owner of a fake shirt manufactured by a fancy branded company was arrested | भिवंडीत ब्रान्डेड कंपनीच्या नावाने बनावट शर्टाचे उत्पादन करणाऱ्या मालकास अटक

भिवंडीत ब्रान्डेड कंपनीच्या नावाने बनावट शर्टाचे उत्पादन करणाऱ्या मालकास अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे७ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्तनामवंत कंपनीचे लेबल वापरून हलक्या दर्जाचे शर्ट बाजारातमालका विरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल

भिवंडी: शहर आणि परिसरांत रेडीमेड कपडे व ड्रेसेस बनविणा-या कंपनीचे मोठ्या संख्येने कारखाने असुन आर्थिक लालसेपोटी एका रेडीमेड कारखानदाराने चक्क नामवंत कंपनीचे लेबल लावून कमी दर्जाचे शर्ट बाजारात आणल्याच्या तक्रारीवरून शहरातील गुन्हे शाखेने धाड टाकून सुमारे ७ लाख ९०हजाराचे शर्ट जप्त केले.
भरत हसमुखराय जोशी(६०) असे पोलीसांनी अटक केलेल्या व्यापा-याचे नांव असुन ते घाटकोपर येथे रहात आहे. त्यांचे तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत श्री अरिहंत काँम्प्लेक्समध्ये दुस-यामाळ्यावर रेडीमेड कपडे बनविण्याचा कारखाना आहे. त्याने नामवंत कंपनीच्या दर्जेदार शर्टाचे लेबल वापरून हलक्या दर्जाचे शर्ट बाजारात विक्रीस आणले होते. या बाबत कंपनीस माहिती मिळाल्या नंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून नामवंत कंपनीचे लेबल लावलेले ३९ बॉक्समध्ये एकुण ७७६ शर्ट आढळून आले. तसेच त्या बॉक्सवर व शर्टवर लोगो,प्राईज टॅग,कागदी रिबन,चौकोनी लेबल असे पॅकींग सामान आढळून आले. पोलीसांनी हा ७ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी कारखाना मालक भरत हसमुखराय जोशी यांच्या विरोधात कॉपीराईटचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात नोंद केला असुन त्यास कोर्टात हजर केले असता २० आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The owner of a fake shirt manufactured by a fancy branded company was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.