निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची जेवणावळ, डाळभातासह लाडूंची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:32 PM2019-04-28T23:32:46+5:302019-04-29T06:08:41+5:30

भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत

One crore meal for election workers, laddoo party with ground nut | निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची जेवणावळ, डाळभातासह लाडूंची मेजवानी

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची जेवणावळ, डाळभातासह लाडूंची मेजवानी

Next

ठाणे : भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी मतदानकेंद्रांवरील अधिकारी- कर्मचारी व जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणेचे कार्यालयांमधील कर्मचारी अशा सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या जेवणावळीवर सुमारे एक कोटी रुपये खर्च होणार आहेत.

एका मतदानकेंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यावरील नियंत्रण व व्यवस्थापन आदी १० जणांचे मनुष्यबळ एका केंद्रासाठी नियोजित असल्याचे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी सांगितले. या अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे १५० रुपये भोजनभत्ता मिळतो. त्यातूनच, ही भोजनव्यवस्था करण्यात आल्याचे सोमाणी यांनी नमूद केले. त्यांना फूड पॅकेट दिले जाणार आहेत. संध्याकाळी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्य जमा करण्यासाठी जाणाºया अधिकारी-कर्मचाºयांना जेवण देण्याचीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ या मतदानकेंद्रांवर दुपारच्या वेळी वर्किंग लंच आणि मतदान संपल्यानंतर साहित्य जमा करावयाच्या ठिकाणी संध्याकाळी चहापाणी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेने केली आहे. यानुसार, फूड पॅकेट देण्याचे निश्चित झाले आहे. यात उन्हामुळे अन्न खराब होणार नाही, अशा पदार्थांची निवड केली आहे. त्यामध्ये डाळ, भात आणि स्वीट म्हणून लाडू या फूड पॅकेटमध्ये राहणार आहेत. अधिकारी व कर्मचाºयांना हे एकाच प्रकारचे शाकाहारी पॅकेट देण्याचे निश्चित केले आहे. वर्र्किं ग अवर्समध्ये देण्यात येणाऱ्या या पॅकेटमधील अन्नपदार्थ उन्हाच्या वाढत्या तापमानातही खराब होणार नाहीत, याची काळजी घेतल्याचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने या भत्त्याच्या रकमेत पुलाव, दोन लाडू आणि आलूमटारची भाजी देण्याचा मेनू निश्चित केलेला आहे. परंतु, या अन्नपदार्थांचे पॅकेट आपल्याकडील हवामानात लवकर खराब होईल, तसे होऊ नये म्हणून जिल्ह्णातील हवामानास अनुसरून पॅकेटमधील अन्नपदार्थ निश्चित केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

ई-निविदेद्वारे भोजनाचे दर निश्चित

१) सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाच्या जेवणावळीसाठी ई-टेंडरिंगद्वारे ठेकेदार निश्चित केला आहे. यासाठी १६० रुपये दराने अंदाजे ५५ हजार मनुष्यबळासाठी ई-निविदा काढल्या. परंतु, साहाय्यकारी मतदानकेंद्रांची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळाची संख्या सुमारे ६७ हजारांपेक्षा जास्त दिसून येत आहे. यामुळे निविदेद्वारे १५० रूपये दर निश्चित होऊन जेवणावळीचे फूड पॅकेट देण्याचे ठरवण्यात आले. दीडशे रुपयाच्या भोजनभत्त्यातून केली सोय

२) एका मतदानकेंद्रासाठी दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन आहे. यानुसार, सहा हजार ७१५ केंद्रांवर ६७ हजार मनुष्यबळ उपयुक्त आहे. यात मतदानकेंद्रांसाठी निश्चित केलेल्या २८ हजार ९६९ मनुष्यबळासह त्यावरील नियंत्रणासाठी असलेल्या कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आदी ६७ हजार कर्मचाऱ्यांना वर्किंग अवर्समध्ये मिळणाऱ्या १५० रुपये भोजनभत्त्यातून या जेवणावळीचे नियोजन केले आहे.

Web Title: One crore meal for election workers, laddoo party with ground nut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.