‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:13 AM2017-12-06T01:13:32+5:302017-12-06T01:13:53+5:30

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

'Okhi' due to the rainy record in the city after Okiiboki, Thane in 2010 | ‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

Next

ठाणे : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आधीच हिवाळ््यातील गारवा आणि त्यात पावसामुळे रहिवासी आणखीनच गारठून गेले. या वादळामुळे अनेक शाळा बंद राहिल्या. पावसाने वाहतूकही मंदावली आणि सर्व शहरे काही काळ ओकीबोकी झाली.
ठाण्यात २०१० नंतरच्या दुसºया क्रमांकाच्या पावसाची नोंद या ओखीमुळे झाली. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. त्यामुले ठाणे शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ठाणे आपत्ती विभागाकडे १२ तक्रारी आल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉर्टसर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर सहा अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. कोपरीत खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाºया घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला देण्यास सुचवले होते. जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे त्यात म्हटले होते. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील देण्यात आल्या.
भाजीपाला लागवडीला, अन्य पिकांना या पावसाचा फटका बसल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात पावसाने सुधारणा झाली. मात्र त्याची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

प्रचाराला पहिल्याच दिवशी पावसाने दिला फटका
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचे अतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचार सुरू होईल, अशी स्थिती होती, पण ओखी चक्रीवादळाने बदललेल्या हवामानाने त्यावर पाणी पडले. प्रचाराच्या नियोजनाची धूळधाण उडाली. कार्यकर्तेच गोळा होऊ न शकल्याने उमेदवारांना स्वत:च फिरून जमेल तेवढा प्रचार करावा लागल्याची माहिती पाचही तालुक्यांतून हाती आली आहे. ओखी चक्रीवादळामुळे शाळांना सुटी देण्यात आली. तरीही काही शाळा पूर्ण किंवा अर्धा दिवस सुरू असल्याने कुटुंबे घरात अडकून पडली. सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही दिवसभर अधूनमधून पडत होता. त्यामुळे शेती, पिकांवर लक्ष ठेवण्यात शेतकरी गुंतून गेले. भाजीपाल्याचे पीक घेणाºयांना या पावसाने तडाखा दिला. त्याच्यासह अन्य पिकांबाबत अंदाज घेण्याचे शेतकºयांचे काम दिवसभर सुरू होते.त्यामुळे ज्यांच्यासाठी प्रचार करायचा तेच जागेवर नसल्याने उमेदवारांचा विरस झाला. त्यातही अनेकांचे कार्यकर्तेच जमले नाहीत. खास करून महिला घरात, पावसामुळे कामात अडकून पडल्याने त्याही बाहेर पडल्या नाहीत. त्याचा फटका प्रचाराला बसला.
 

Web Title: 'Okhi' due to the rainy record in the city after Okiiboki, Thane in 2010

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.