नव्या वर्षात ध्यास स्मार्ट सिटी बनवण्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:11 AM2018-01-01T07:11:13+5:302018-01-01T07:11:20+5:30

डिसेंबर महिना सरताना सगळ्यांकडून गोळाबेरीज सुरू होते सरत्या वर्षाची. सरत्या वर्षात आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा कळत-नकळतपणे लेखाजोखा मांडला जातो. नव्या वर्षाचा संकल्पही सुरू होतो. हे संकल्प जसे व्यक्तींचे असतात, तसेच संस्थांचेही असतात.

 In the new year, making Dhaya smart city | नव्या वर्षात ध्यास स्मार्ट सिटी बनवण्याचा

नव्या वर्षात ध्यास स्मार्ट सिटी बनवण्याचा

Next

डिसेंबर महिना सरताना सगळ्यांकडून गोळाबेरीज सुरू होते सरत्या वर्षाची. सरत्या वर्षात आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा कळत-नकळतपणे लेखाजोखा मांडला जातो. नव्या वर्षाचा संकल्पही सुरू होतो. हे संकल्प जसे व्यक्तींचे असतात, तसेच संस्थांचेही असतात. त्यांच्या प्रमुखांचे असतात. आपल्या जिल्ह्यातील प्रमुख शहरे असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदरचे महापौर आणि अंबरनाथ-बदलापूरच्या नगराध्यक्षांनीही त्यात्या शहरांतील नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. संकल्प केले आहेत. ते ‘व्हिजन २०१८’ समजून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधला संवाद. त्यातील ठाणे आणि कल्याण या शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. ती शहरे स्मार्ट होण्याच्या वाटेवर आहेत. त्याबाबत त्यांच्या महापौरांनी भूमिका मांडली; तर उरलेले महापौर, नगराध्यक्षांनी त्यांच्या त्यांच्या शहरांच्या विकासाचा आपल्या संकल्पनेतील आराखडाच ‘लोकमत’च्या वाचकांसाठी मांडला. त्यातून समोर आली, ठाणे जिल्ह्याच्या शहरीकरणाची दिशा...

महिलांसाठीच्या योजनांवर देणार भर

स्मार्ट सिटीच्या दिशेने ठाणे शहर वाटचाल करत असताना शहरातील नागरिकांसाठी मूलभूत सेवासुविधांबरोबरच महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणे, हे देखील महापालिकेचे कर्तव्य आहे. ठाण्याची प्रथम नागरिक या नात्याने महिला म्हणून नवीन वर्षात शहरातील महिलांसाठी सर्व प्रभागांत व्यायामशाळा, योगा सेंटर, स्टेशन व वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, नोकरदार महिलांसाठी स्टेशन परिसरात पाळणाघर, मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्याकडे कल राहणार आहे. तसेच महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी महिलांसाठी तेजस्विनी बससेवा आदी उपक्रम राबवण्यावर भर असेल, अशी माहिती ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाण्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आले. यात तत्कालीन नेत्यांचे योगदान आहे. वेळोवेळी विकासात समस्त ठाणेकरांनी सहकार्य व योगदान दिले, म्हणून ठाण्याचा सर्वांगीण विकास करु शकलो, त्यातूनच ठाणे शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली, ही बाब ठाणेकरांना अभिमानास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. मूलभूत सेवासुविधा देण्यासोबत दूरगामी प्रकल्पदेखील राबवणेही महत्त्वाचे आहे.
आगामी काळात वाहतूककोंडी सोडवणे, मुबलक पाणीपुरवठा, झोपडपट्टी विभागामध्ये अद्ययावत स्वच्छतागृह, एलईडी दिवे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा, नागरिकांसाठी उद्याने, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा, दुर्धर आजारांचे निदान केंद्र, मेट्रो प्रकल्प राबवणे, भुयारी गटार योजना प्रभावीपणे राबवणे, इलेक्ट्रिक बससेवा या योजनांवर भर देणार आहे. तसेच अधिकृत व बेकायदा, धोकादायक व झोपडपट्टींचा समूह विकास योजनेंतर्गत विकासाला प्राधान्य देणार आहे.
झोपडपट्टी व ग्रामीण विभागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी विविध उपक्रम राबवणार, महाविद्यालयीन शिक्षण मिळावे, यासाठीही विशेष प्रयत्न असतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतात. या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर असेल. दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा, तसेच त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी जागा व वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, परिवहन सेवेच्या माध्यमातून मोफत बससेवा, युवकांसाठी अद्ययावत व्यायामशाळा, महाविद्यालयीन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मैदान विकसित करण्यावर भर

महापालिकेच्या माध्यमातून युवकयुवतींच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी महापौर चषक अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात येते. ते अधिक प्रभावीपणे राबवणार. शालेय मुले व युवकांसाठी महापालिका कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी मैदान विकसित करण्यावर विशेष भर दिला जाईल. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले प्रकल्प कार्यान्वित करणे, नागरिकांच्या मागणी व गरजेनुसार नवीन प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे.


योजनांच्या प्रारंभाचे वर्ष

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सरते वर्ष आर्थिककोंडीचे होते. त्यावर मात करत काही कामे करण्याचा प्रयत्न केला. नववर्षात स्मार्ट सिटीच्या कामाचा प्रारंभ होऊन त्याला सुरुवात झालेली असेल, असा विश्वास कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
यंदा पालिकेने स्मार्ट सिटी व सापर्डे, वाडेघर येथे कल्याण विकास परियोजनेची तयारी केली. स्मार्ट सिटी व कल्याण विकास परियोजनेसाठी कोरियन कंपनीशी सामंजस्य करार केला. स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसर व खाडीकिनारा विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सिटी पार्कचाही समावेश आहे.
येत्या वर्षी मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाच्या कामाला गती दिली जाईल. ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या अमृत योजनेतील मलनि:सारण, भुयारी गटारे, पाणीपुरवठा योजना, हरित क्षेत्र विकास, स्मार्ट सिटी यासाठी निधी मिळाला आहे. या योजनांची कामेही सुरू होतील. महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजनाही लागू होण्याची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे. त्यातून धोकादायक इमारतीत राहणाºयांना दिलासा मिळू शकतो. शहराची अस्वच्छ प्रतिमा पुसून काढण्यासाठी व्यापारी, नागरिक यांच्यात कचºयाबाबत जागृती केली जाईल. त्यातून मानसिकता बदलण्याचे काम करण्याचा संकल्प आहे. महापालिकेची वसुली चांगली झाल्यास आर्थिक संकट दूर होऊ शकते. सरकारने महापालिकेचे थकीत अनुदान व एलबीटीपोटी थकलेली रक्कम दिली तरी महापालिकेस जवळपास ७०० कोटींचा आधार मिळून महापालिकेची यंदाची व पुढील वर्षातील आर्थिक तूट एका झटक्यात भरून निघू शकते.

पार्किंग-फेरीवाला धोरणावर भर

कल्याण- मलंग रस्त्याचे काम २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवलीत उभारला जाणार आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पार्किंगचे त्याचबरोबर फेरीवाला धोरण ठरवले जाणार आहे.

Web Title:  In the new year, making Dhaya smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या