नागरिकांच्या दैनंदिनी तणावमृक्तीसाठी ‘सहज साधना’ ध्यान साधनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:03 PM2019-01-04T21:03:57+5:302019-01-04T21:09:09+5:30

मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Need for meditation meditation 'easy meditation' for the daily tension of citizens | नागरिकांच्या दैनंदिनी तणावमृक्तीसाठी ‘सहज साधना’ ध्यान साधनेची गरज

‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी)

Next
ठळक मुद्दे ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदीधकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या

सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांचे जीवन मोठ्या धकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’ या साध्या, सरळ आणि सोप्या ध्यान साधनेची गरज असल्याचे ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी) यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांचे ‘गुरुदेव’ आत्मचरित्र भानुदीदींनी लिहिले आहे. याशिवाय, ‘गॉड अ‍ॅण्ड गॉडेस’ हे देवीदेवतांचे माहात्म्य स्पष्ट करणारा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. यानंतर, त्या लवकरच ‘अष्टलक्ष्मी’ या नावाचे पुस्तक प्रकाशन करण्याच्या तयारीत आहेत. यासारख्या दुर्मीळ पुस्तकांच्या लिखाणासह देशात व परदेशात ‘ध्यान साधना’चे विविध कार्यक्रम घेण्यासाठी मिळणारी ऊर्जा बंधू श्री श्री रवी शंकर यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Need for meditation meditation 'easy meditation' for the daily tension of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.