महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:57 PM2018-09-04T18:57:54+5:302018-09-04T18:58:36+5:30

वाढलेली महागाई तसेच  पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या अवास्तव दरवाढी विरोधात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारचा निषेध करत निदर्शने केली. 

NCP movement against inflation | महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

 मीरारोड - वाढलेली महागाई तसेच  पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या अवास्तव दरवाढी विरोधात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारचा निषेध करत निदर्शने केली. 

 मीरा-भाईंदर राष्ट्रवादी शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले, कार्याध्यक्ष  संतोष पेंडुरकर सह  नरेंद्र भाटिया, पौर्णिमा काटकर, नामदेव इथापे, संगीता जगताप आदी जिल्हा पदाधिकारी, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, विद्यार्थी सेल, अल्पसंख्याक सेल, सांस्कृतिक सेल चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  मीरारोड च्या शिवार उद्यान जवळील रिलायन्स पेट्रोल पंप समोर निदर्शने केली. 

पेट्रोल,डिझेल, गॅस, दरवाढी आणि महागाईला भाजपाचे केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली नोटाबंदी, राफेल विमान खरेदी घोटाळा घडला असून सामान्य माणूस व छोटे व्यापारी उध्वस्त झाल्याचे दुबोले म्हणाले. 

तर मुख्यमंत्री यांनी शहरात सतत येऊन कार्यक्रम केले. पण मेट्रो, नाट्यगृह, सुर्या नवीन पाणी योजना, ओव्हरब्रिज, फुटब्रिज, नवीन मुख्यालयाचे भूमिपूजन आदी कामांना सुरवातच झाली नाही. भुयारी गटार योजना मुदत संपूनही सुरू झालेली नाही . केवळ थापेबाजी आणि लोकांची पिळवणूक करण्याचे काम या भाजपा सरकारने केल्याचा आरोप पेंडुरकर यांनी केला. 

विविध मुद्दे जनतेसमोर मांडत भाजपा च्या केंद्र व राज्य सरकारचा, तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचा पत्रक वाटून,  बॅनर ला गाजराचा हार घालून जाहीर निषेध करण्यात आला.

Web Title: NCP movement against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.