कल्याणमधील झाडे खिळे, बॅनरमुक्त, नागरिकांमध्ये जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:49 AM2019-05-02T00:49:37+5:302019-05-02T00:50:14+5:30

महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी मुंबईतील अंघोळीची गोळी या संस्थेने कल्याणमध्ये खिळेमुक्त झाडे हा उपक्रम राबवला. टाटा पॉवर कंपनीचे कर्मचारी व तिरंगा जागृती विचार मंचची त्याला साथ लाभली.

Nation of trees in Kalyan, Banner free, citizens awareness | कल्याणमधील झाडे खिळे, बॅनरमुक्त, नागरिकांमध्ये जागृती

कल्याणमधील झाडे खिळे, बॅनरमुक्त, नागरिकांमध्ये जागृती

Next

कल्याण : महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी मुंबईतील अंघोळीची गोळी या संस्थेने कल्याणमध्ये खिळेमुक्त झाडे हा उपक्रम राबवला. टाटा पॉवर कंपनीचे कर्मचारी व तिरंगा जागृती विचार मंचची त्याला साथ लाभली. अंघोळीची गोळी संस्था पाणीबचतीबाबत जागृती आणि झाडांवरील खिळे काढण्याचे काम करते. सजीव झाडांनाही संवेदना असतात. फक्त त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. परंतु, त्यांच्या वेदना आम्हाला ऐकू येतात. त्यामुळे त्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगत खिळेमुक्त झाडे या संकल्पनेचा उदय सर्वात प्रथम पुण्यात झाला. त्यातून, प्रेरित होऊन वर्षभरापासून मुंबईतही हा उपक्रम राबवला जात आहे. कल्याणमध्ये या उपक्रमांतर्गत बुधवारी झाडांवर ठोकलेले खिळे काढण्यात आले.

वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे. त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्र म सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा,असे आवाहन संस्थेचे ठाणे जिल्हा समन्वयक सागर वाळके यांनी केले आहे. पुण्याच्या माधव पाटील या तरुणाने सुरू केलेली खिळेमुक्त झाडे मोहीम ठाणे, मुंबई परिसरांत विस्तारण्यासाठी संस्थेची मुंबईतील टीम प्रयत्न करत आहे. या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत त्यांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे ठाणे जिल्हा सदस्य संकेत जाधव यांनी सांगितले. मोहिमेत स्वप्नील शिरसाठ, भूषण राजेशिर्के, वैभव गायकवाड, रोहित गोडसे, मंगेश तिवारी या युवकांनी अंघोळीची गोळी संकल्पना आणि खिळेमुक्त झाडे अभियानाची गरज उपस्थितांना समजावून सांगितली.

महापालिकांशी पत्रव्यवहार
वृक्षसंवर्धनासाठी अनेक महापालिकांसोबत संस्था पत्रव्यवहार करत आहे, अशी माहिती खिळेमुक्त झाडे मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील यांनी दिली. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरासंरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Nation of trees in Kalyan, Banner free, citizens awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण