आमदार-खासदार निधी अपघात रोखण्यासाठी वापरा, कपिल पाटील यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:11 AM2018-02-01T06:11:49+5:302018-02-01T06:12:02+5:30

अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेविषयी जोरदार चर्चा झाली.

MLA-MP Use funds to prevent funding, Kapil Patil's suggestions | आमदार-खासदार निधी अपघात रोखण्यासाठी वापरा, कपिल पाटील यांची सूचना

आमदार-खासदार निधी अपघात रोखण्यासाठी वापरा, कपिल पाटील यांची सूचना

Next

ठाणे : अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेविषयी जोरदार चर्चा झाली.
बैठकीला भिवंडीचे महापौर जावेद दळवी, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, बदलापूरच्या नगराध्यक्षा विजया राऊत, वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, उपजिल्हाधिकारी जे .बी. वळवी यांच्यासह आरटीओचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आमदार-खासदार निधीबरोबरच कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) देखील वापरण्याचे मार्गदर्शन त्यांनी या वेळी उपस्थितांना केले. बेजबाबदार व नियमबाह्य वाहतुकीमुळे होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रॅफिक पार्कतयार करावे, पार्र्किंगअभावी रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली असता रस्ता अरुंद होत असल्यामुळे अपघात होतात. यावर उपाययोजना म्हणून महापालिका क्षेत्रात अवजड वाहनांसाठी महापालिकांनी पार्किंग झोन तयार करणे अपेक्षित असल्याच्या सूचना पाटील यांनी केल्या.
केंद्र व राज्य सरकारांच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वय साधल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे रस्त्याचा डीपीआर (आराखडा) तयार करताना स्थानिक संस्थांना विश्वासात घेण्याचे मार्गदर्शनही पाटील यांनी या वेळी केले.
वॉर्डनसाठी जिल्हा नियोजनमधूनदेखील निधी घेण्याची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. वाहतूक पोलिसांच्या अपुºया संख्येमुळे वाहतूक नियंत्रणाला मर्यादा येतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पाटील यांनी वाहतूक वॉर्डन नियुक्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करण्याचे सूतोवाच या वेळी केले.
 

Web Title: MLA-MP Use funds to prevent funding, Kapil Patil's suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे