कल्याणमध्ये श्रीसंत राममारूती महाराजांचे स्मारक उभारणार, महापौर राजेंद्र देवळेकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 08:36 PM2017-09-14T20:36:44+5:302017-09-14T20:37:01+5:30

कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. 

Mayor Rajendra Devlekar announces to set up memorial of Srisant Rammuruthi Maharaj in Kalyan | कल्याणमध्ये श्रीसंत राममारूती महाराजांचे स्मारक उभारणार, महापौर राजेंद्र देवळेकर यांची घोषणा

कल्याणमध्ये श्रीसंत राममारूती महाराजांचे स्मारक उभारणार, महापौर राजेंद्र देवळेकर यांची घोषणा

googlenewsNext

कल्याण, दि. 14 - कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. 
    श्रीसंत राममारूती महाराज शताब्दी महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्य़ांचा प्रारंभ देवळेकर यांच्या हस्ते श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून झाला. यावेळी देवळेकर बोलत होते. ते या सोहळ्य़ाचे स्वागताध्यक्ष आहेत. आज 99 व्या वर्षाच्या पुण्यतिथी सोहळ्य़ांची सांगता होऊन शताब्दी वर्षाला सुरूवात झाली. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी, शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष दिलीप दळवी, पत्रकार तुषार राजे, उपाध्यक्ष दिपक सोनाळकर, सुधाकर वैद्य, प्रफुल्ल गवळी, हभप जगन्नाथ महाराज पाटील, रामानंद सुळे, संजय दिघे, प्रकाश दिघे इ. मान्यवर उपस्थित होते. 
    देवळेकर म्हणाले, कल्याण-डोंबिवली ही संताची भूमी आहे. आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वरांच्या जिंवत समाधीनंतर कल्याणमध्ये श्री सहजानंद स्वामींची जिंवत समाधी आहे. श्री संत राममारूती महाराजांची समाधी एक जागृत समाधी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे श्री संत राममारूती महाराजांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्य़ास आम्ही फार पूर्वीपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत येत होतो अशाप्रकारे त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
    श्रीसंत राममारूती महाराज यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 ते 20्18 र्पयत दरमहा विविध धार्मिक कार्यक्रम समितीतर्फे केला जाणार आहे. गेली 99 वर्षे हजारो भक्त  समाधीस्थळी येऊन दर्शन घेतात. शताब्दी महोत्सव मोठय़ा उत्साही वातावरणात करण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी यांनी सांगितले. 
    श्री संत राममारूती महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सादर करून 99 वा पुण्यतिथी उत्सव पार पाडला. या उत्सवासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणो, दादर, विलेपार्लेसह संपूर्ण मुंबई, पुणो, नागपूर अन्य राज्ये व परदेशातून ही श्रींच्या भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. आज श्रींच्या समाधीवर लघु रूद्राभिषेक, काल्याचे किर्तन, महाप्रसाद, भंडारा , सायंकाळी श्रींच्या पादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली, असे राजे यांनी सांगितले. 
    हा उत्सव यशस्वी होण्यासाठी सुरेश गुप्ते, अॅड मंदार दुव्रे, किशोर देशपांडे, पंकज वढावकर, प्रशांत कारखनीस, पराद कर्णिक, चंद्रकांत चित्रे, केदार सोनाळकर, गणोश खैरनार, उर्मिला फणसे, शितल गडकरी, नैना कर्णिक यांनी मेहनत घेतली.

Web Title: Mayor Rajendra Devlekar announces to set up memorial of Srisant Rammuruthi Maharaj in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.