कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:35 AM2018-02-08T02:35:04+5:302018-02-08T02:35:15+5:30

मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

March 31 deadline for Kamoth | कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

Next

पनवेल : मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीलामुंबईत झालेल्या बैठकीत दिले.
भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांच्या घेतलेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कामोठ्यातील चार मीटरच्या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जोशी यांनी, सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्यानंतर १ मार्चपर्यंत वर्क आॅर्डर काढून ३१ मार्चपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामोठे शहराजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार वर्षांच्या कालावधीत २८ जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. या रखडलेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी आजवर सह्यांची मोहीम, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजीदेखील कामोठ्यातील रहिवाशांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील मल्हार महोत्सवाला आले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाºया रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली.
रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यासोबत घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आरपीआय जिल्हाअध्यक्ष जगदीश गायकवाड, कफ संस्थेचे अध्यक्ष अरु ण भिसे, भाजपा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, नगरसेवक प्रमोद भगत आदी उपस्थित होते.
>मृत्यूच्या सापळ्यातून सुटका
सायन-पनवेल महामार्गाच्या रुं दीकरणाच्या कामामुळे कामोठे शहरातून मुंबईकडे जाणाºया रस्त्याच्या दिशेने थेट जोडणी अस्तित्वात नसल्यामुळे कामोठे शहरातून येणाºया वाहनांना कळंबोली सर्कलपर्यंत जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा मुंबईकडे जावे लागत असल्यामुळे वेळ व लाखो लिटर इंधन वाया जात असून, दररोज होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या अडचणींमुळे अपघात झाले आहेत. चार वर्षांत २८ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास मृत्यूच्या सापळ्यातून आमची सुटका होईल, अशी भावना या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

Web Title: March 31 deadline for Kamoth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई