अंबरनाथ : ‘अंबर भरारी’ आयोजित मराठी फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ गुरुवारी दुपारी बिग सिनेमा चित्रपटगृहात करण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ९ मराठी चित्रपट आणि ६ शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहेत.
अंबरनाथमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना एकत्रित करून माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबर भरारी ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या पुढाकारानेच २९ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत हा फेस्टिव्हल पार पडणार आहे.
या चार दिवसांत रमा माधव, ड्रीम मॉल, ओळख, पोस्टर बॉइज, सामर्थ्य, रेनी डे, सिंड्रेला, ते दोन दिवस आणि सोपानाची आई बहिणाबाई हे नऊ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सोबत, सहा लघुचित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. रमा माधव या चित्रपटाने या फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपट महोत्सवासाठी एकूण २३ चित्रपटांच्या प्रवेशिका होत्या. त्यातील या ९ चित्रपटांची निवड झाली.
(प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.