आमदार मेहतांचा भाऊ व मेव्हण्यावर पर्यावरणाचा ऱ्हास प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 08:31 PM2018-05-16T20:31:36+5:302018-05-16T20:31:36+5:30

वादग्रस्त ठरलेल्या या 711 क्लबचे काम अपूर्ण असतानाच 12 मे रोजी झगमगीत असा क्लब सदस्य नोंदणी शुल्क कार्यक्रम झाला होता . 

Mahatma's brother and brother nabbed again in the case of environmental degradation | आमदार मेहतांचा भाऊ व मेव्हण्यावर पर्यावरणाचा ऱ्हास प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल

आमदार मेहतांचा भाऊ व मेव्हण्यावर पर्यावरणाचा ऱ्हास प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल

Next

मीरारोड - पर्यावरणाचा ऱ्हास करून 711 क्लब ची बेकायदा कुंपण भिंत बांधून भराव केल्या प्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा भाऊ तथा महापौर डिंपल मेहता यांचे पती विनोद मेहता सह आ. मेहतांचा मेव्हणा रजनीकांत सिंह तसेच माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर आदीं विरोधात शासनाने मीरारोड पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे . वादग्रस्त ठरलेल्या या 711 क्लबचे काम अपूर्ण असतानाच 12 मे रोजी झगमगीत असा क्लब सदस्य नोंदणी शुल्क कार्यक्रम झाला होता .  मीरारोडच्या कनकिया भागात कांदळवन , पाणथळ , ना विकास क्षेत्र व सीआरझेड बाधित जमिनीं मध्ये पालिकेचा कचरा तसेच दगड माती टाकून भूखंड तयार करण्यात आले आहेत . भारतीय संविधानच्या कलम 48 क व 51 क ( छ ) नुसार नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे बंधनकारक आहे . शासनाच्या 25 ऑकटोबर 2001 च्या आदेशा नुसार कांदळवन संरक्षित केले आहे . मुंबई उच्च न्यायालयाने देखील 6 ऑकटोबर 2005 रोजी जनहित याचिकेत आदेश देऊन कांदळवनास संरक्षण दिले. या क्षेत्रात भराव , बांधकामे करण्यास मनाई करत कांदळवन हे संरक्षित वन म्हणून जाहीर करणे तसेच झालेली भराव , बांधकामे काढून टाकून टाकण्याचे स्पष्ट आदेश दिले होते . 2013 मध्ये उच्च न्यायालयाने पाणथळ जमिनीच्या संरक्षणाचे आदेश देत भराव , बांधकामे करण्यास मनाई केली आहे . न्यायालयाच्या आदेशाने शासनाच्या कांदळवन सेल चे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन यांनी 2014 मध्ये जेसलपार्क ते कनकिया परिसराची पाहणी करून आपला सचित्र अहवाल न्यायालयास सादर केला होता .

त्या अहवालात कनकिया भागात पाणथळ , कांदळवन चा ऱ्हास करून भराव , बांधकामे सुरु असल्याचे स्पष्ट नमूद केले होते . तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी कांदळवन सेलला पत्र देऊन आपण अहवालातल्या जागांचे संरक्षण करू असे आश्वस्त केले होते. पालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सुद्धा दिले होते . परंतु या परिसरात कांदळवनचा ऱ्हास केला म्हणून २०१० साली विनोद मेहता वर पहिला गुन्हा दाखल झाला होता . त्या नंतर २०१५ व २०१६ मध्ये देखील याच भूखंडात कांदळवनाची तोड , भराव करून भरतीचे पाणी बंद करणे , पाण्याचे प्रवाह बंद करून पाणथळ व कांदळवन नष्ट करणे असे प्रकार सतत करून पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. महापालिकेने देखील भराव प्रकरणी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता.

उच्च न्यायालयाचे आदेश , दाखल गुन्हे , पाहणी अहवाल , नाविकास क्षेत्र व सीआरझेड च्या नियमांचे उल्लंघन आदी सतत होत असताना देखील महापालिकेने ह्या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करून क्लब साठी बेसमेंट , तळ व पहिला मजला अशी चक्क बांधकाम परवानगी दिली आहे . महापालिकेत भाजपाची सत्ता असून आ . मेहता यांचा वरचष्मा आहे . शिवाय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने महापालिका, पोलीस आदी ब्र देखील काढत नाहीत . त्यामुळे अनेक तक्रारी करून देखील आ. मेहता व त्यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनी च्या एकही प्रकरणात काही कारवाईच होत नसल्याचा आरोप तक्रारदार सतत करत आहेत . या बांधकामा सह सदर परिसरात पुन्हा कांदळवनाची तोड करत पुन्हा बेकायदा भराव , कुंपणभिंत आदी बांधकामे सुरूच ठेवण्यात आली . ४ एप्रिल रोजी महापालिका अधिकारी व पाणथळ समिती सदस्यांच्या पाहणीत हे प्रकार समोर आले होते . तलाठी रोहन वैष्णव यांनी वरिष्ठांच्या आदेशा नंतर घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला होता . जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर , प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी पवार , तहसीलदार अधिक पाटील यांच्या निर्देशा नंतर मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी विनोद मेहता , रजनीकांत सिंह , प्रशांत केळुस्कर सह नीला कृष्णा पाटील व इतर , कमलाबाई चंद्रकांत व इतर , हरेश्वर अनंत पाटील व इतर , डंपर आदी गाड्यांचा मालक नरुउद्दीन राजानी व चालक हरीगेंद पाल आदीं विरोधात मंगळवारी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय .

मेहतांचा भाऊ तथा महापौर डिंपल यांचे पती असलेले विनोद मेहतांवर तर याच भागात चौथ्यांदा गुन्हा दाखल झाला आहे . आ. मेहतांचे मेव्हणे रजनीकांत वर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झालाय . पण इतके गुन्हे दाखल होऊन देखील पालिका प्रशासन मात्र चिडीचूप आहे . तर पोलिसांच्या तपास व कारवाई वर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे .

Web Title: Mahatma's brother and brother nabbed again in the case of environmental degradation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.