छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'महानाट्य'चा प्रयोग ठाणेकर प्रेक्षकांसाठी तीन दिवस विनामूल्य

By सुरेश लोखंडे | Published: March 19, 2024 01:29 PM2024-03-19T13:29:36+5:302024-03-19T13:30:08+5:30

या "महानाट्य" कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

mahanatya on the life of chhatrapati shivaji maharaj is free for thanekar audience for three days | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'महानाट्य'चा प्रयोग ठाणेकर प्रेक्षकांसाठी तीन दिवस विनामूल्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'महानाट्य'चा प्रयोग ठाणेकर प्रेक्षकांसाठी तीन दिवस विनामूल्य

सुरेश लोखंडे, ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

या उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत  "महानाट्य"  या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये  22 मार्च ते दि. 24 मार्च 2024 या तीन दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत हायलॅन्ड मैदान, ढोकाळी, माजिवाडा ठाणे (पश्चिम) या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  

आतापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तरी ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या "महानाट्य" कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: mahanatya on the life of chhatrapati shivaji maharaj is free for thanekar audience for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.