पैशाचे अमिष दाखवून शरीरविक्रयास लावणाऱ्या रिक्षा चालक महिलेस अटक: दोन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:02 PM2019-04-02T18:02:23+5:302019-04-02T18:08:42+5:30

गरजू तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयास लावणाऱ्या संगीता बटावले (४०, रा. मानपाडा, ठाणे) या रिक्षा चालक महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी अटक केली आहे. रिक्षाच्या आडून ती हा अनैतिक व्यवसाय करीत असल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

Ladies Rickshaw drivers arrested for sex racket: Two women released | पैशाचे अमिष दाखवून शरीरविक्रयास लावणाऱ्या रिक्षा चालक महिलेस अटक: दोन तरुणींची सुटका

रिक्षाच्या अडून अनैतिक व्यवसाय

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरिक्षाच्या अडून अनैतिक व्यवसाय

ठाणे: नोकरीचे आणि पैशाचे अमिष दाखवून गरजू तरुणींना शरीर विक्रयास लावणा-या संगीता बटावले (४०, रा. मानपाडा, ठाणे) या रिक्षा चालक महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी अटक केली आहे. तिच्या तावडीतून दोन पिडीत तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एक रिक्षा चालक महिला जांभळी नाका येथील भावना हॉटेल समोर दोन तरुणींना शरीरविक्रयासाठी आणणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रंजना बनसोडे यांच्या पथकाने १ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास बनावट गिºहाईक पाठवून या प्रकाराची खात्री केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर तिला तिच्या ताब्यातून २८ आणि ३० वर्षीय दोन पिडीत तरुणींची या पथकाने सुटका केली. याप्रकरणी तिच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. तिला २ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. गरजू महिलांना किंवा तरुणींना नोकरीचे तसेच जादा पैशाचे अमिष दाखवून ती या व्यवसायात ढकलत होती. तर असेच एखादे गिºहाईक रिक्षात बसल्यानंतर ती थेट या मुलींचा शरीरविक्रयासाठी रिक्षामध्येच सौदा करायची. दोन ते तीन हजार रुपये घेऊन त्यातील निम्मी रक्कम या मुलींना ती द्यायची. गेल्या एक वर्षभरापासून ती हा अनैतिक व्यापार करीत होती. असाच एक सौदा झाल्यानंतर सोमवारी पोलिसांनी तिला पकडले.या प्रकरणात तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Ladies Rickshaw drivers arrested for sex racket: Two women released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.