कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:33 AM2018-12-17T03:33:33+5:302018-12-17T03:34:02+5:30

नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला, ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई ही शहरे वेगाने वाढणार

Kondive Metro is the alternative - Ashwini Bhide | कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

Next

ठाणे : पुढच्या पिढीसाठी भविष्याचा वेध घ्यावा लागेल. प्रदूषणाची समस्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी १०० टक्के सुटेलच असे नाही, वाहनेदेखील कमी होणार नाहीत, पण वाहतुकीसाठी पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल, असे मत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

अर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी भिडे यांनी गुंफले. यावेळी आमदार संजय केळकर, अर्थ फाउंडेशनच्या अ‍ॅड. माधवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महानगरातील अक्राळविक्राळ समस्या सोडविण्यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारचा व्यापक दृष्टिकोन असतो. भविष्यातील मोठ्या समस्या सोडविताना उद्भवणाऱ्या छोट्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि तिथून नागरिकांचा विरोध होतो. मुंबईनंतर मेट्रो प्रकल्प ठाण्यात होणार आहे. २०३१मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी होईल आणि दुसरीकडे उर्वरित शहरांची लोकसंख्या ही अधिकाधिक वाढत जाईल.
ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई, विरार ही शहरे वेगाने वाढणार आहेत. वाढलेल्या शहरांवर सोयीसुविधांचे रोपण करणे कठीण असते. मग सरकारला विविध प्रकल्प हाती घ्यावे लागतात, पण त्याचबरोबर नागरी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. परंतु यात राज्य सरकार आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मेट्रो हा पर्याय आहे. वाढती वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.

‘सर्वांचे सहकार्य आवश्यक’
भविष्यात मुंबईची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाची गुणवत्ता चांगली होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलेल. भूमिगत असलेला हा एकमेव प्रकल्प असून भुयारी मार्गातून मेट्रो चालवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्यातही हा प्रकल्प हळुहळू राबविला जाईल. मेट्रो प्रकल्प ३ हा २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोतून दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील. एकूण क्षमता १७ लाखांची आहे. इतका मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Kondive Metro is the alternative - Ashwini Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे