कल्याण लोकसभा: भाजपा, शिवसेनेचा बुथरचनेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:32 AM2019-03-14T00:32:33+5:302019-03-14T00:32:44+5:30

दोन्ही पक्ष ११ लाख मतदारांशी साधणार संपर्क, ६१८ बुथ सज्ज

Kalyan Lok Sabha: BJP, Shiv Sena's emphasis on busting | कल्याण लोकसभा: भाजपा, शिवसेनेचा बुथरचनेवर भर

कल्याण लोकसभा: भाजपा, शिवसेनेचा बुथरचनेवर भर

Next

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जोमाने तयारी सुरू केली आहे. कल्याण मतदारसंघातील डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी भाजपाचे ४०७ बुथ सज्ज झाले आहेत. त्यात डोंबिवली पूर्व मंडल आणि कल्याण ग्रामीणमधील २१९, तर डोंबिवली पश्चिम मंडलातील पक्षाचे १८८ बुथ आहेत. शिवसेनेचेही दोन्ही मतदारसंघ मिळून ६१८ बुथची रचना पूर्ण झाली आहे. या रचनेतून दोन्ही पक्ष सुमारे ११ लाख मतदारांशी संपर्क साधणार आहेत.

भाजपाची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, युतीची एकत्रित बैठक, त्यात मिळणाऱ्या सूचनांनुसार कार्यकर्ते कामाला लागतील, असे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, साधारणपणे ‘एक बुथ २५ युथ’, अशी रचना आहे. प्रत्येक बुथवर बुथप्रमुख नेमला आहे. त्याच्यासोबत कामासाठी प्रत्येकी २५ कार्यकर्ते, पदाधिकारी असा चमू तयार केला आहे. एका बुथच्या टीमला सरासरी ११०० मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही बुथरचना केली आहे. पण, युतीची अजून एकत्रित बैठक न झाल्याने नेमके काम कसे करायचे आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे ते पुढे म्हणाले.

बुथच्या माध्यमातून चार लाख ४७ हजार ७०० मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघांमधील मतदारांचा त्यात समावेश आहे. कार्यकर्त्यांना याद्यांचे वाटपदेखील झाले आहे. कोणकोणत्या मतदारांशी कोणी संपर्क करायचा, याचेदेखील नियोजन झाल्याचे बीडवाडकर यांनी सांगितले.

सेनेचे ‘एक बुथ २० युथ’
शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, पक्षाच्या धोरणांनुसार ‘एक बुथ २० युथ’, अशी संकल्पना राबवण्यात येत आहे.
कार्यकर्ते निवडणूक कामासाठी तयार झाले आहेत. त्या माध्यमातून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ३०३ बुथ, तर कल्याण ग्रामीणमध्येही ३१५ बुथ तयार केले आहेत.
त्या पक्षाच्या माध्यमातूनही एका यादीत सुमारे १२०० मतदार असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Kalyan Lok Sabha: BJP, Shiv Sena's emphasis on busting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.