ठाणे जिल्ह्यातील गोवर - रूबेला लसीकरणावर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:13 PM2018-12-02T18:13:52+5:302018-12-02T18:20:11+5:30

जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ३५ जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यावर या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी अटलांटा युएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या कामकाजाच्या पहाणीस प्रारंभ केला आहे. त्यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व महापालिकां, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रूग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे

International viewers' eyes on Gauge - Rubella vaccination in Thane district | ठाणे जिल्ह्यातील गोवर - रूबेला लसीकरणावर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नजर

पहाणी करण्यासाठी परदेशातील अटलांटा युएस येथील आंतरराष्ट्रीय निरीक्षक डॉ. कॉलीन ह्या ठाणे येथे उपस्थित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकाना गोवर, रूबेला लसीकरण करण्याचे उद्दीष्ठआतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना गोवर रु बेला प्रतिबंधात्मक लस पहाणी करण्यासाठी परदेशातील अटलांटा युएस येथील आंतरराष्ट्रीय निरीक्षक डॉ. कॉलीन ह्या ठाणे येथे उपस्थित


ठाणे : जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकाना गोवर, रूबेला लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. यानुसार लसीकरण गांभीर्याने व सुरळीत होत आहे की नाही, याची पहाणी करण्यासाठी परदेशातील अटलांटा युएस येथील आंतरराष्ट्रीय निरीक्षक डॉ. कॉलीन ह्या ठाणे येथे उपस्थित झाल्या आहेत. त्यांनी प्रथम ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागस भेट देऊन या मोहिमेच्या कामाची पहाणी केली.
जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ३५ जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यावर या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी अटलांटा युएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या कामकाजाच्या पहाणीस प्रारंभ केला आहे. त्यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व महापालिकां, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रूग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. संबंधीत आरोग्य यंत्रणांकडून लसीकरणाचे काम गांभीर्याने होत आहे की नाही, याकडे त्यां कटाक्षाने लक्ष देत असून वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पहाणी दौऱ्यानंतर त्यांनी  सायंकाळी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व सिव्हील रूग्णालयास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी डॉ. कोलीन यांचे स्वागत केले. यावेळी देखील त्यांनी जिल्ह्याभरातील वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात ठाणेसह रायगड, पालघर या तीन जिल्हह्यातील लसीकरणाचे काम सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना गोवर रु बेला प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. जिल्ह्याच्या ज्या भागात लसीकरणास प्रतिसाद कमी आहे तिथे तो वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेघे यांनी सांगितले.
 

Web Title: International viewers' eyes on Gauge - Rubella vaccination in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.