शेतमालातून कल्याणमध्ये अवतरली भारतीय विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:26 AM2017-08-14T03:26:16+5:302017-08-14T03:26:19+5:30

अचानकपणे शेतमालाचा भाव पडला, तरी त्याचा सध्या ग्राहकांना काहीच फायदा होत नाही.

Indian variety divergence from welfare to welfare | शेतमालातून कल्याणमध्ये अवतरली भारतीय विविधता

शेतमालातून कल्याणमध्ये अवतरली भारतीय विविधता

Next

अचानकपणे शेतमालाचा भाव पडला, तरी त्याचा सध्या ग्राहकांना काहीच फायदा होत नाही. व्यापारीच नफा कमावून मोकळे होतात. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मालाचे भाव प्रचंड कडाडतात तेव्हाही ग्राहकच नाडला जातो. शेतकरी आणि ग्राहक हे दोन्ही घटक संघटित नसल्याचा तोटा होतो. त्यामुळे परराज्यातून कल्याणला येणाºया मालाची माहिती वेळच्यावेळी ग्राहकांना समजली, तर त्यांचाही फायदा होईल. उदा. टोमॅटोचे महाराष्ट्रातील भाव कडाडले असतील तर ग्राहकांना कर्नाटक, हिमाचलचे टोमॅटो स्वस्तात मिळू शकतात. महाराष्ट्रात डाळी कडाडल्या असतील तर गुजरात, मध्य प्रदेशातील डाळी स्वस्तात मिळू शकतात. सध्या कांदा कडाडतो आहे, अशा वेळी परराज्यातील कांदा भाव नियंत्रित करू शकतो. त्यासाठी घाऊकच नव्हे, तर किरकोळ खरेदी करणाºया ग्राहकांनी ही व्यवस्था समजून घेतली पाहिजे आणि नियमितपणे बाजार समितीत फेरी मारायला हवी.
नवी मुंबईत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एखाद्या मालाचे भाव चढले किंवा पडले तर त्याची बातमी होते. पण अनेकदा तशी परिस्थिती कल्याणला नसते. त्यामुळे येथून माल नेणारे व्यापारीही अकारण भाव वाढवतात. ही भाडेवाढ उगाचच ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यातही शेतमालाचे भाव, आवक-जावक ही फक्त मुंबईच्या बाजार समितीतील गृहीत धरली जाते. त्यामुळे कल्याणच्या बाजार समितीत माल उपलब्ध असूनही अकारण कृत्रिम दरवाढ होते, असे छोट्या व्यापाºयांनी आणि बाजार समितीत नियमित येणाºया ग्राहकांनी लक्षात आणून दिले.
राज्यातील दुसºया क्रमांकाच्या असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्ये तसेच सर्व प्रकारची कडधान्ये येतात, अशी माहिती समितीचे सहायक सचिव यशवंत पाटील यांनी दिली. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या आवारात अशीच मालाची आवक वाढावी, तो माल टिकवून ठेवता यावा, यासाठी भविष्यात विविध योजना राबवायच्या असल्याचे पाटील म्हणाले.
धान्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून तसेच घोटीहून तांदूळ तर पंजाबमधून गहू येतो. सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातून ज्वारी आणि मराठवाडा, विदर्भातून कडधान्ये येतात. डाळीही येतात, मात्र समितीचे त्यावर नियमन नसल्याने त्यापासून समितीला उत्पन्न मिळत नाही. पण ग्राहकांना चांगला पर्याय मिळू शकतो, असे ते म्हणाले. वर्षाला ५०० कोटींची उलाढाल होते. भात खरेदी केंद्र सुरू करणार आहे.
विनाकारण इमारतींची उभारणी
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी विनाकारण इमारती उभारल्या आहेत. बाहेरील व्यापारी येथे गाळे घेतात. मराठी माणसाने व्यापाराच्या क्षेत्रात पुढे यायला हवे, असे मत भाजीपाल्याचे व्यापारी रंगनाथ विचारे यांनी सांगितले. आज या गाळ्यांमध्ये मालाची चढउतार करण्याचे काम मराठी माणूस असलेला माथाडी करतो. थोडक्यात, तो हमाली करतो, असे त्यांनी सांगितले. तोही व्यापारी व्हायला हवा. आज समितीत अपुºया सुविधा असल्याने व्यापाºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या वाढल्या तर येथील उलाढाल वाढेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
५० टक्केही सुविधा मिळत नाही
भविष्यात समितीने चांगल्या उपाययोजना केल्या, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र, आज ५० टक्केही सुविधा मिळत नसल्याचे कांदा-बटाट्याचे व्यापारी विलास पाटील यांनी सांगितले. मार्केटच्या पायºया तुटलेल्या आहेत. गोण्यांची ने-आण करताना हमालांचे अपघात झाले आहेत. वर्ष ते दीड वर्ष समितीकडे पायºया दुरुस्त करून द्या, यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, आमच्या पदरी निराशाच येते, असे त्यांनी नमूद केले. यामुळे समस्या घेऊन जाणेच आम्ही व्यापाºयांनी बंद केले, असे खेदाने पाटील यांनी सांगितले. कमी सुरक्षारक्षक असल्याने येथे सर्रास चोरीच्या घटना घडतात. व्यापाºयांचे नुकसान होते, त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
२० वर्षे होऊनही मार्केटचा पत्ता नाही
अनेक संचालक मंडळांनी येथे सत्ता उपभोगली. मात्र, अन्नधान्य मार्केटची मुख्य इमारत २० वर्षे झाली, तरी पूर्ण होऊ शकली नाही. याला समितीमधील सदस्यांचे राजकारण, परस्परांतील मतभेद कारणीभूत असल्याचे अन्नधान्याचे व्यापारी वसनजीभाई यांनी संतापाने सांगितले. व्यापाºयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आजवर एकाही सभापतीने आमची बैठक घेतली नाही. कधीही विश्वासात घेतले नाही, असे त्यांनी सांगितले. रखडलेल्या गाळ्यांचे काम पूर्ण होण्यासाठी व्यापाºयांनी अधिक पैसे दिले, बँकांकडून कर्ज घेतले. मात्र, अद्याप ते आमच्या ताब्यात दिलेले नाही. समितीला सहकार्य करणे, हीच कायम व्यापाºयांची भूमिका असल्याचे वसनजीभाई यांनी सांगितले.
हिरव्यागार भाजीपाल्याचा डोंगर
नाशिक, पुण्याबरोबरच पंजाब, इंदूर, गुजरातमधून कांदा, बटाटा यांची आवक होते. तर, मध्य प्रदेशातून लसूण येतो, असे पाटील यांनी सांगितले. टोमॅटो, वांगी, गवार, तोंडली, काकडी, दुधी, लालभोपळा, कोबी, फ्लॉवर, भेंडी आदी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. प्रामुख्याने नाशिक, पुणे येथून त्या येथे येतात. गुजरातमधून मिरची, आंध्र, कर्नाटकमधून कोबी, फ्लॉवर तर हुबळीहून लवंगी मिरची येते. महाराष्ट्रातील नारायणगाव आणि बंगळुरूहून टोमॅटो येतो. कांदा, बटाटा, लसूण यांची वर्षभरात ५ लाख ९० हजार २९९ क्विंटल विक्री होते. शेजारच्याच शहापूर, मुरबाड तालुक्यामधून भेंडी, काकडी, सिमला मिरची येते.
परराज्यांतील फुलांचा सुगंध
या बाजारात परराज्यांतूनही फुलांची आवक होऊ लागल्याने सुगंध दरवळू लागला आहे. झेंडू, गुलाब, शेवंती, लीली, जास्वंद, तर परराज्यांतून मोगरा मोठ्या प्रमाणात येतो, अशी माहिती फुलांचे व्यापारी काशिनाथ नरवडे यांनी दिली. पुण्याहून गुलछडी, बंगळुरूहून मोगरा, पिवळी शेवंती, कोलकाता येथून लाल झेंडू, उस्मानाबादहून पिवळा झेंडू येतो. सीझनला परराज्यातून १०० टन, तर रोज २५ ते ३० टन फुलांची आवक होते. विमानाने फुले येतात. या बाजारातून पिवळा, लाल झेंडू गुजरातला जातो. साधारण वर्षाला १ लाख १२ हजार ७७१ क्विंटल विक्री होते, असे नरवडे यांनी सांगितले.
>फुल मार्केटची होणार पक्की इमारत
सध्याचे फुल मार्केट हे पत्र्याचे असल्याने व्यापाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पत्रे असल्याने उन्हाळ्यात खूप त्रास होतो. तसेच पावसाळ्यात पाणी साचणे किंवा चिखलामुळे त्यांना माल ठेवायला नीट जागा होत नाही. आज या ठिकाणी १२५ ते १५० फुलांचे व्यापारी असल्याचे ते म्हणाले. रोज मोठ्या संख्येने फुले येथे विक्रीसाठी येतात. भायखळ्यानंतर कल्याण हे मध्यवर्ती असे फुल मार्केट असल्याचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले. नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याच्या आराखड्याला केडीएमसीने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठवला आहे. तळ अधिक एक मजल्याची ही इमारत असेल. यात तळ मजल्यावर ३४७ व्यापाºयांसाठी ओटे बांधण्यात येणार आहेत. फुले ही नाशवंत असल्याने पहिल्या मजल्यावर कोल्ड स्टोअरेजची सुविधा असेल. या ठिकाणी व्यापाºयांना कार्यक्रमासाठी हॉलही बांधण्यात येणार आहे. पण, जर व्यापाºयांना पूर्ण मजल्यावर कोल्ड स्टोअरेज हवे असेल, तर तशी सोय केली जाईल. अर्थात, कोल्ड स्टोअरेजचा खर्च हा व्यापाºयांनाच करावा लागणार आहे. याच इमारतीत किरकोळ भाजीविक्रेत्यांसाठी गाळे असतील. एकूण गाळे ११६ असतील. अर्थात, फुल मार्केटसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असल्याने गोंधळ उडणार नाही, हेही त्यांनी नमूद केले. फुल मार्केटबरोबरच सुकामेवा मार्केट, भातखरेदी केंद्र तसेच शेतकरी भवन उभारण्याचा निर्धार समितीने केला आहे. या सर्वांचा आराखडाही तयार आहे. मात्र, त्याकरिता निधीची आवश्यकता आहे. समितीने काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. आज तो आकडा कोटींच्या घरात गेला आहे. त्यातील थकबाकीची अर्धी रक्कम भरावी लागणार आहे. समितीवरील कर्ज फिटल्यावर निधीकरिता नव्याने कर्ज घेता येईल, असे ते म्हणाले. भातखरेदीसाठी समितीच्या आवारात गोदामाची व्यवस्था करता आली नाही तरी गोवेली, खडवली येथे गोदामे उभारता येईल. त्याच परिसरात भात पिकवला जातो.
>फळांची रेलचेल
द्राक्ष, पेरू, पपई, कलिंगड, केळी, टरबूज, डाळिंब, हापूस ही फळे या बाजार समितीत येतात. गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथूनही आंबा येथे विक्रीसाठी येतो. काश्मीर, दिल्ली, हिमाचल प्रदेशमधून सफरचंद, पेर, आलुबुखार प्रामुख्याने येतात. वर्षभरात या फळांची १ लाख ४० हजार ३४ क्विंटल विक्री होेते.
>सध्याची समिती अतिशय चांगले काम करत आहे. येथे सुविधा वाढत आहेत. एखादी अडचण आल्यास समितीकडून त्वरित ती सोडवली जाते. भविष्यात समिती शेतकरी भवन उभारणार असून त्याचा नक्कीच फायदा होईल.
- सचिन गायकर,
शेतकरी
>आता केवळ म्हशींचा बाजार
पूर्वी मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरत होता. पण, आता सरकारने गोवंश हत्येवर बंदी घातल्याने केवळ म्हशींचीच खरेदीविक्री

Web Title: Indian variety divergence from welfare to welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.