भिवंडी हत्याकांडातील गंभीर जखमी इसमाचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर

By नितीन पंडित | Published: April 4, 2024 10:23 PM2024-04-04T22:23:40+5:302024-04-04T22:24:51+5:30

मयत इसमांसह सहा जणांवर देखील गुन्हा दाखल

incident of knife attack in which two people were killed, one died and two were injured | भिवंडी हत्याकांडातील गंभीर जखमी इसमाचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर

भिवंडी हत्याकांडातील गंभीर जखमी इसमाचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर

भिवंडी : पूर्व वैमान्यातून दोन गटात झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या हत्याकांडातील मृतांची संख्या दोन वर पोहोचली आहे. तर बुधवारी शांतीनगर पोलिसांनी मयत इसमासह गंभीर जखमी असलेल्या सहा जणांच्या विरोधी गटावर देखील गुन्हा दाखल केला आहे. 

इस्तीयाक शेख वय ३२ वर्ष असे मृत्यू झालेल्या गंभीर जखमी इसमाचे नाव आहे.या प्रकरणात याआधी मारहाण करणाऱ्या एका गटातील दहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांनतर आता मारहाण व मयत झालेल्या दुसऱ्या गटातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात मारहाण करणाऱ्या गटातील जखमी आरीफ खान यास उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले होते.उपचारा नंतर त्यास हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असता त्याने दिलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील मयत जुबेर व इस्तीयक यांच्यासह ,जुनेद,शहबाज,अबुजर,साजीद,अबताफ व मुस्तफा यांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला .

Web Title: incident of knife attack in which two people were killed, one died and two were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.