नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा ठाण्यातून हस्तगत, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:10 PM2018-05-22T18:10:56+5:302018-05-22T18:10:56+5:30

कफ सिरपचा साठा बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या जोगेश्वरी येथील एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Illegal stock of cough syrup seized in Thane, one arrested | नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा ठाण्यातून हस्तगत, एकास अटक

thane

Next
ठळक मुद्देआरोपी जोगेश्वरीचा रहिवासी३ लाखाचा मुद्देमाल हस्तगतठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री हस्तगत केला. याप्रकरणी जोगेश्वरी येथील एका रहिवाशास अटक करण्यात आली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इटरनिटी मॉलजवळ एका कारमधून कफ सिरपचा साठा येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ला सोमवारी रात्री मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या पथकाने इटरनिटी मॉलजवळ सापळा रचला. रात्री ९ वाजताच्या सुमारास या पथकास पोपटी रंगाच्या एका कारवर संशय आला. पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर.सी. कफ सिरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या. हा साठा जोगेश्वरी येथील श्रवण रूपाराम चौधरी याच्या ताब्यात होता. पोलिसांनी विचारपूस केली असता औषध बाळगण्याचा त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. नशेसाठी या औषधाची विक्री होत असून, आरोपीने त्यासाठीच हा साठा बेकायदेशीरपणे मिळवला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून औषधाचा साठा, मोबाईल फोन आणि औषधाच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ३ लाख १७ हजार ६८0 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Web Title: Illegal stock of cough syrup seized in Thane, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.