अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा मित्राच्या मदतीने पत्नीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:42 PM2018-12-31T21:42:44+5:302018-12-31T21:50:13+5:30

विवाहानंतर रायगड येथील एका मित्राशी अनैतिक संबंध ठेवणा-या पत्नीला विरोध केल्यामुळे ठाणे महापालिकेतील सफाई कामगार पती गोपी नाईक यालाच महेश कराळे या मित्राच्या मदतीने प्रिया या पत्नीने खून केल्याची घटना घोडबंदर रोड येथे शनिवारी घडली. दोन्ही आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Husband murder by wife: due to oppose of immoral relationship of wife with her boy friend | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा मित्राच्या मदतीने पत्नीने केला खून

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील घटना

Next
ठळक मुद्देठाण्याच्या घोडबंदर रोडवरील घटनाघटनेनंतर दोघेही पसारकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या गोपी किसन नाईक (३०) या आपल्याच पतीचा महेश कराळे (२८, रा. नेरळ, जि. रायगड) या मित्राच्या मदतीने प्रिया नाईक (२८) हिने खून केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून खुनानंतर पसार झालेल्या या दोघांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घोडबंदर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफाल्य आवास या टीएमसी बिल्डिंग मधील तिसºया मजल्यावर राहणा-या ठाणे महापालिकेतील सफाई कामगार गोपी नाईक याला २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याची पत्नी प्रिया हिने दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेतील ही व्यक्ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितल्यानंतर ती तिथून पसार झाली. ही महिला पसार झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी कळवा, आतकोनेश्वरनगर येथे राहणारा गोपीचा भाऊ दिलीप याच्याकडे चौकशी केली. तेंव्हा त्याने भावाचा मृतदेह ओळखला. डाव्या पायाने लुळा आणि डोक्याला गंभीर जखम तसेच डोक्याची भुवई, कानाचे मागे, मानेवर, हाताचा कोपर, पायावर अशा अनेक ठिकाणी खरचटलेल्या खुणा आढळल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोपीची पत्नी प्रिया हिने तिच्या मित्रासह गोपीला जखमी अवस्थेत आणल्याचेही दिलीपने दिलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले. अधिक चौकशीमध्ये तिसºया मजल्यावरील सदनिका क्रमांक तीनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने पाहणी केली असता, बेडरुमच्या टाईल्सवर, बाल्कनीच्या टाईल्सवर आणि बेडवरही ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले. तसेच फ्लॅट समोरील तिसºया मजल्याच्या पॅसेजमध्ये तिस-या माळ्यापासून ते तळमजल्यापर्यंत पाय-यांवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले. या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्येही २९ डिसेंबर रोजी पहाटे ३.५० वा. च्या सुमारास प्रिया आणि तिचा मित्र गोपीला जखमी अवस्थेत घेऊन जातांना आढळले. या आधारे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी प्रिया आणि तिचा साथीदार महेश कराळे यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Husband murder by wife: due to oppose of immoral relationship of wife with her boy friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.