ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:07 PM2018-01-04T17:07:44+5:302018-01-04T17:14:59+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातर्फे रविवार ७ जानेवारी रोजी हिंदू चेतना संगमचे आयोजन केले आहे. ठाणे महानगरात सात ठिकाणी हिंदू चेतना संगमचे कार्यक्र म योजले आहेत.

Hindu Consciousness Sangam by the Konkan region of Rashtriya Swayamsevak Sangh in Thane | ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम

ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम

Next
ठळक मुद्देठाण्यात सात ठिकाणी संगमस्वयंसेवक नोंदणीसाठी अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅपपूर्वतयारीसाठी जॉईन आरएसएसचे स्टाँल, पथनाट्य, घरोघरी संपर्क

ठाणे : समाजातील चांगुलपणाचे भव्य दर्शन घडविण्यासाठी, सामान्य व्यक्तीमधील विधायक सक्रि यतेचा अनुभव देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे रविवार ७ जानेवारी रोजी २०१८ रोजी ‘हिंदू चेतना संगम’ चे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथे २५५ ठिकाणी हा उपक्र म होणार आहे अशी माहिती गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ठाण्याचे संघचालक डॉ. विवेकानंद वडके आणि शहर कार्यवाह सचिन लेले यांनी दिली. यावेळी रा. स्व. संघ, कोकण प्रांत प्रचार विभाग सदस्य मकरंद मुळे सदस्य उपस्थित होते.
      ठाणे महानगरात ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत सात कार्यक्र म होणार आहेत. मुंब्रा, कळवा, ठाणे पूर्व, वागळे, घोडबंदर, पोखरण आणि नौपाडा येथे हिंदू चेतना संगम होतील. हिंदू चेतना संगमाच्या नोंदणीसाठी अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ठाण्यात होणाºया संगमात संघ विचारधारेच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पूर्वतयारीसाठी जॉईन आरएसएसचे स्टाँल ठाण्याच्या विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले होते. पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रा. स्व. संघाच्या मुलभूत पद्धतीनुसार घरोघरी संपर्क करून या विशेष उपक्र माची माहिती दिली जात आहे, असे रा. स्व. संघ ठाणे जिल्हा संघचालक डॉ. विवेकानंद वडके आणि शहर कार्यवाह सचिन लेले यांनी सांगितले. ठाणे महानगरात ११ शालेय विद्यार्थी, १ महाविद्यालयीन विद्यार्थी, १० तरु ण, १० प्रौढ अश्या एकूण ३२ दैनंदिन शाखा तर, शालेय विद्यार्थी ७, महाविद्यालयीन १, तरु ण १० अशा एकूण १८ साप्ताहिक शाखा चालतात. ठाण्यातील रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या वामनराव ओक रक्तपेढीने आपल्या कामातून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वनवासी कल्याण आश्रम येऊर, भार्इंदरपाडा यासह ठाण्याच्या विविध भागात कार्यरत आहे. भगिनी निवेदिताच्या माध्यमातून बालवाड्या, विद्याथ़्र्यांचे आरोग्य यावर भर दिला जात आहे. विज्ञान भारती कडून ठाण्यातील १०० शाळांमध्ये विज्ञान जागृतीचे कार्यक्र म राबवले जातात. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. अशी माहिती यावेळी दिली. रा. स्व.संघाने ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हिंदू संघटनेच्या आधारे संघाने राष्ट्रीय भावनेचे जागरण केले आहे. समाजाचा आत्मविश्वास जागवून समरसतायुक्त एकात्म समाजाच्या पुनर्निर्मितीसाठी संघाने घेतलेल्या पुढाकाराला समाजाने उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रबोधनाची चळवळ सशक्त करणाºया संघ स्वयंसेवकांनी विवेकाचा जागर केला आहे. देशभरात विविध प्रकारच्या १ लाख ६६ हजार सेवा कार्यांच्या माध्यमातून तर कोकण प्रांतात ४५० सेवाकाºयांच्याद्वारे संघ सक्रि य आहे. संपूर्ण देशात ५७, १८५ दैनंदिन शाखा, १४, ८९६ साप्तिहक शाखा, ४५१ मासिक शाखा यातून सक्रि य असेलेले स्वयंसेवक समाजात सक्रि य आहेत. कोकण प्रांतात ५७० दैनंदिन शाखा आणि ४५१ साप्ताहिक शाखा चालतात.

Web Title: Hindu Consciousness Sangam by the Konkan region of Rashtriya Swayamsevak Sangh in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.