‘तो’ पेरतोय पर्यावरण रक्षणाचे ‘बीज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:47 AM2019-06-16T00:47:40+5:302019-06-16T06:34:46+5:30

पिशव्यांमध्ये सीडबॉल्स; दुकानांत करणार प्रसार

'He' sits' environmental protection 'seeds' | ‘तो’ पेरतोय पर्यावरण रक्षणाचे ‘बीज’

‘तो’ पेरतोय पर्यावरण रक्षणाचे ‘बीज’

Next

ठाणे : पर्यावरणाची हानी हा सध्या कळीचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. मात्र, कुणालाही या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वृक्षलागवडीचे अनेक जण कार्यक्रम करतात, पण ते फोटोसेशनपुरतेच मर्यादित राहतात. ही उदासीनता दूर करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील चासोळे येथील चंद्रकांत राऊ त याने नामी शक्कल लढवली आहे. यासाठी त्याने विशिष्ट जागी कप्पा असलेल्या कागदी पिशव्या बनवून त्यात सीडबॉल्स ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मुरबाडमधील पर्यटनस्थळावरील दुकाने, टपऱ्यांमध्ये या पिशव्या ठेवण्यात येणार असून वापरानंतर त्या फेकताच पावसाळ्यात त्यातील बिया रुजतील, अशी त्याची संकल्पना आहे.

पर्यावरण दिनाचे निमित्त साधून वृक्षारोपण, निसर्ग राखण्याची शपथ देण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले. पावसाळ्यात शहरी पर्यटक मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, नाणेघाट तसेच हरिश्चंद्र गड, भैरव गड व अन्य धबधब्यांवर धाव घेतात. मात्र, तोपर्यंत त्यांना पर्यावरणाचा विसर पडलेला असतो. प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, दारूच्या बाटल्या, थर्माकॉलच्या डिश तिथेच फेकून पर्यावरणाचा ºहास करतात.

हरित क्षेत्र वाढावे, यासाठी विविध संस्थाही पुढाकार घेत आहेत. मागील वर्षी ठाण्यातील प्राणिक आरोग्य सेंटरने फळांच्या बिया असलेले सात हजार सीडबॉल्स येऊर आणि माळशेज घाट परिसरातील जंगलांमध्ये टाकले होते. हे सीडबॉल्स प्राणिक आरोग्य सेंटर व प्राणिक हिलिंग ग्रुप, मुरबाड यांनी चासोळे गावातून बनवून घेतले होते. याच गावातील चंद्रकांतने या उपक्रमासाठी वर्षभर काय करता येईल, याचा विचार सुरू केला. त्याचदरम्यान राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाली. चंद्रकांतला कागदी पिशव्यांच्या तळाशी हे सीडबॉल्स ठेवण्याची कल्पना सुचली. प्रायोगिक तत्त्वावर सीडबॉल्स असलेल्या कागदी पिशव्या त्याने बनवल्या आहेत. पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात थाटली जाणारी दुकाने वा टपऱ्यांमध्ये या पिशव्या ठेवण्याचा त्याचा मानस आहे. पर्यटकांनी पिशव्यांचा वापर केल्यानंतर त्या उघडवर फेकल्या तरी पर्यावरणाला त्याचा धोका होणार नाही. १०० सीडबॉल्समधील १० बिया रुजल्या तरी झाडांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे त्याने सांगितले.

मुरबाडमध्ये जानेवारी २०१९ ला झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवळे कॉलेजच्या चंद्रकांत, स्वाती कोर, स्वप्नाली अहिरे या विद्यार्थ्यांनी या पिशव्यांची कल्पना माडंली. मान्यवरांनी त्यांच्या या पिशव्यांची विशेष दखल घेतली होती.

सीडबॉल्स म्हणजे काय?
सीडबॉल्स म्हणजे फळबिया असलेला मातीचा चेंडू. विविध झाडांच्या बिया माती, शेणखत आणि गांडूळ खतच्या गोळ्यामध्ये भरल्या जातात. उघड्यावर नुसत्याच टाकलेल्या बिया पाण्याबरोबर वाहून जाण्याची भीती असते. पण, सीडबॉल्स सहज मातीत रुजू शकतील.
मुरबाड तालुक्यातील जंगलांमध्ये जांभूळ, मोह, आवळा, आंबा, खैर, गुलमोहर, बेहडा आदी प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे याच झाडांच्या बियांपासून सीडबॉल्स बनवले आहेत. नैसगिकरीत्या या बिया रुजतील, असे चंद्रकांत म्हणाला. वनविभागाचे अधिकारी तुळीराम हिरवे, शिक्षक विराज घरत यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: 'He' sits' environmental protection 'seeds'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.