दिव्यात राहणा-या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:02 AM2017-10-25T06:02:02+5:302017-10-25T06:02:05+5:30

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला.

Girlfriend's suicide by killing a lover who lives in the street | दिव्यात राहणा-या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

दिव्यात राहणा-या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला. या मुलीची हत्या दोन ते तीन दिवस आधीच केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हत्येनंतर प्रियकराने मुलीच्या नातेवाइकांना फोन करून या घटनेची कल्पना दिली.
वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथील आचल महल्ले ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत इंजिनीअर म्हणून कामाला होती. आचल दिव्यात आई आणि भावासह भाड्याच्या घरात राहात होती. तिचा प्रियकर नेत्राम वर्मा हा अंबरनाथमध्ये कानसई गावात एक खोली भाड्याने घेऊन राहात होता. महिन्याभरापासून आचल तेथे येत असे. तिची आई -भाऊ गावाला गेल्यावर आचलने आपण रुग्णालयात जात असल्याचे शेजाºयांना सांगितले आणि ती घराबाहेर पडली.
त्यानंतर ती प्रियकर नेत्रामसोबत अंबरनाथच्या घरात होती. नेत्राम याने तिची गळा आवळून हत्या केली. तसेच दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू लागल्यावर, त्याने आचलच्या मोबाइलवरून तिच्या मावशीला फोन करून हत्येची माहिती दिली. तसेच मावशीला स्वत:च्या घरचा पत्तादेखील एसएमएसद्वारे पाठविला.
मावशीला हा निरोप मिळताच, आचलच्या नातेवाइकांनी दिव्यातील गाजेखान पठाण याला संपर्क साधत, आचलचा शोध घेण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी पठाण यांनी कानसई गावात तो पत्ता शोधला. पोलिसांच्या मदतीने घर उघडल्यावर आचलचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, तर नेत्रामचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

Web Title: Girlfriend's suicide by killing a lover who lives in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.