ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अनन्या नाटकाचा परिसंवाद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:12 PM2019-04-14T17:12:49+5:302019-04-14T17:14:47+5:30

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अनन्या नाटकाचा परिसंवाद पार पडला.

Full story about the drama | ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अनन्या नाटकाचा परिसंवाद संपन्न

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अनन्या नाटकाचा परिसंवाद संपन्न

Next
ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर अनन्या नाटकाचा परिसंवाद परिसंवादात एकांकिका ते नाटक हा प्रवास मांडला मराठी नाट्य क्षेत्रात एक वेगळा पायंडा पडणार नाटक : किरण नाकती

ठाणे : ठाण्यातील वाचक कट्ट्यावर आयोजित अनन्या नाटकाच्या परिसंवादात नाटकाचे दिग्दर्शक प्रताप फड , अभिनेत्री ऋतुजा बागवे , सहाय्य्क अभिनेत्री अनघा भगरे उपस्थिती होते. अभिनय  कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष   ह्यांनी अनन्या नाटकातील कलाकार व दिग्दर्शकाची मुलाखत घेतली. सदर परिसंवादात एकांकिका ते नाटक हा प्रवास दिग्दर्शक प्रताप फड ह्यांनी मांडला.

   एक वाचनात आलेली गोष्ट तिच्यातून सुचलेली एकांकिकेची संकल्पना सर्व स्पर्धांमध्ये सवाई ठरलेली एकांकिका आणि त्याच नाटक करायचं उचलललेल शिवधनुष्य खूप काही शिकवून गेले. एक चौकटी बाहेर मराठी नाटकाला घेऊन जाणायची उमेद मनात होती आणि त्याला लाभलेली नाटकवेड्या कलाकारांची साथ हेच अनन्याच यश.ह्या नाटकात एम्हणूनच क दिग्दर्शक म्हणून प्रयोग करण्याची आणि भूमिकेसाठी मेहनत घेणारे कलाकार म्हणूनच एक दिग्दर्शक म्हणून मला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली मराठी नाटक आणि मराठी प्रेक्षक कात टाकतोय हे अनन्या सारख्या नाटकामुळे सध्या जाणवून येत असे मत दिग्दर्शक प्रताप फड ह्यांनी व्यक्त केले.  एक गाजलेली एकांकिका एक आव्हानात्मक भूमिका आणि एक प्रयोगात्मक दिग्दर्शक हेच अनन्यातील  माझ्या भूमिकेच्या यशाचं खर गमक आहे. एक हात नसलेली व्यक्ती  हे  नाटकातून दाखवणं खरंच आव्हानात्मक होत पण हे आव्हान दिग्दर्शक आणि माझी आई ह्यांच्या शकली.एक वेगळा विषय  आणि एक आवडलेली भूमिका आणि त्यासाठी मी घेतलेली मेहनत एक कलाकार म्हणून मला खूप काही शिकवून गेली. नाटक खरंच वेगळं आहे सामान्य माणसाला जगण्याचा एक वेगळा अर्थ उलगडतो असे मत अनन्याची भूमिका साकारणाऱ्या ऋतुजा बागवे हिने व्यक्त केले.  नाटक म्हणून अभिनयाचा पहिला प्रयत्न  एक छोटीशी पण महत्वाची भूमिका आणि प्रताप फड सारखे दिग्दर्शक आणि ऋतुजा सारखी सहकलाकार असल्यामुळे ह्या नाटकात माझी भूमिकेला न्याय द्यायचा माझा प्रयत्न होता अजून खूप शिकायचंय आणि कलाकार म्हणून वेगळी ओळख निर्माण करायचीय  असे मत सहाय्य्क अभिनेत्री अनघा भगरे हिने व्यक्त केले. 

    सर्व सामान्य माणसाने हे नाटक नक्की पाहावे आपल्याला देवाने सर्व काही सुरळीत दिलेले असताना आपण अडचणी आल्या का निराश होतो पण दोन हात गमावलेल्या मुलीच्या आयुष्यातील संघर्षाची गोष्ट जगण्याचा एक वेगळा अर्थ समजावून जाते.कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून देखील हे नाटक खूप शिकवून गेलं.मी स्वतः हे नाटक पाहिलंय आणि मराठी नाट्य क्षेत्रात एक वेगळा पायंडा पडणार हे नाटक आहे. निराशेवर मत कशी करायची कारण न देता हे शिकायचंय तर हे नाटक पाहावं असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

Web Title: Full story about the drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.