गरीब रुग्णांना मोफत डायलेसिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:56 AM2017-11-10T00:56:47+5:302017-11-10T00:56:49+5:30

कोपरी येथील प्रसूतिगृहात सुरूकरण्यात आलेल्या नव्या डायलेसिस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Free dialysis for poor patients | गरीब रुग्णांना मोफत डायलेसिस

गरीब रुग्णांना मोफत डायलेसिस

Next

ठाणे : कोपरी येथील प्रसूतिगृहात सुरूकरण्यात आलेल्या नव्या डायलेसिस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर, आता सोमवारपासून ते ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये एक लाखापर्यंत कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत राहणार आहे. सध्या तीन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. उर्वरित दोन सेंटर येत्या दीड ते दोन महिन्यांत सुरू होतील, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली आहे.
प्रत्येक केंद्रावर १० डायलेसिस मशीन अशा पाच केंद्रांवर ५० मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर १० बेड अशा पाच केंद्रांवर ५० बेड उपलब्ध करून दिले आहेत. या डायलेसिस केंद्रांमध्ये ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, त्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते आठ लाख आहे, त्या रुग्णांसाठी ५२० रुपये फी आकारण्यात येणार आहे. तसेच ८ लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी १०४० रुपये फी आकारण्यात येणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात कोपरी प्रसूतिगृह, कोपरी (पूर्व), कोरस रु ग्णालय, वर्तकनगर, ठाणे (प.) आणि रोझा गार्डिनिया हॉस्पिटल, कासारवडवली अशा तीन ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित सी.आर. वाडिया रु ग्णालय आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आरोग्य केंद्र येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाºया डायलेसिसच्या रुग्णांना अल्पदरात डायलेसिसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात सुरू असलेल्या डायलेसिस सेंटरचा मुद्दा काही वर्षांपूर्वी चांगलाच वादग्रस्त ठरला होता.

Web Title: Free dialysis for poor patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.