फ्लॅट विक्रीच्या आड साडे चौदा लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: April 17, 2024 10:00 PM2024-04-17T22:00:23+5:302024-04-17T22:01:46+5:30

दहिसर पूर्वेच्या एसव्ही मार्गावर राहणाऱ्या भावना मोकाशी ह्या सदनिका खरेदीच्या शोधात होत्या

Fourteen and a half lakh fraud under the guise of selling a flat A case has been registered against four | फ्लॅट विक्रीच्या आड साडे चौदा लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

फ्लॅट विक्रीच्या आड साडे चौदा लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

मीरारोड - आधी नायगाव व नंतर वसई येथे फ्लॅट घेऊन देतो सांगून एका महिलेची साडे चौदा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे . 

दहिसर पूर्वेच्या एसव्ही मार्गावर राहणाऱ्या भावना मोकाशी ह्या सदनिका खरेदीच्या शोधात होत्या . त्यांचे भावोजी इर्शाद शेख यांच्या ओळखीतून त्यांची स्वतःला बिल्डर सांगणाऱ्या दत्त वाळुंज सह अल्ताफ हसन कुरेशी यांच्याशी ओळख झाली होती . वाळुंज याने आपल्याला पैश्यांची गरज असल्याने नायगाव येथील फ्लॅट ११ लाखांना विक्री करायचा सांगितले . भावना यांनी त्यास तयारी दर्शवत वाळुंज यांना रोख व धनादेश मार्फत ११ लाख रुपये दिले .   चंद्रपाडा येथील श्री सद्गुरु अपार्टमेंट येथील सुनीलदत्त तिवारी यांचा फ्लॅटचे एग्रीमेंट फॉर सेल नोटरीचे ७ लाख रुपये किमतीचे कागदपत्र बनवून दिले. 

नंतर मात्र तो वाळुंज फोन उचलत नसल्याने इर्शाद व त्यांचा मोठा भाऊ नौशाद शेख याला अल्ताफ कुरेशीने नायगाव ऐवजी वसईच्या एव्हरशाईन येथील फ्लॅट  घ्या , तो चांगला आहे असे सांगितले . वसईचा फ्लॅट पसंत पडल्याने त्याच्या नोंदणीसाठीचे ३ लाख ४२ हजार रुपये वाळुंज याच्या खात्यात जमा केले . दत्ता वाळुंज सह  अल्ताफ कुरेशी, रफिक शेख आणि यासीन शेख हे भावना आदींना रजिस्ट्रेशनसाठी म्हणून विरार येथे भेटले . त्यावेळी वाळुंज याने हसन अपार्टमेंट , सेक्टर ६ , एव्हरशाईन नगर येथील सदनिकेची पावर ऑफ एटरनी नोंदणी करून दिली आणि सदनिकेची चावी दिली . त्यात काही सामान होते . 

ते सामान काढण्यासाठी म्हणून अल्ताफ हा चावी घेऊन गेला . नंतर त्याने  चावी आणून दिली नाही शिवाय वाळुंज याने सदनिका दिली नाही व पैसे पण दिले नाहीत . अखेर भावना यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी १६ एप्रिल रोजी वाळुंज , अल्ताफ , रफिक व यासिन ह्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण हे तपास करत आहेत . 

Web Title: Fourteen and a half lakh fraud under the guise of selling a flat A case has been registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.