भिवंडीत कचराकुंडीत सापडले आधारकार्ड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:37 AM2019-03-13T00:37:50+5:302019-03-13T00:37:59+5:30

निवडणुकीत गैरवापर होण्याची भीती, प्रांताधिकारी देणार अहवाल

Found cards in the fired trash; District Magistrate's order | भिवंडीत कचराकुंडीत सापडले आधारकार्ड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

भिवंडीत कचराकुंडीत सापडले आधारकार्ड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील अजयनगर परिसरात कुचराकुंडीत सुमारे साडेतीनशे आधारकार्ड सापडल्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यात तर्कवितर्क काढले जात आहेत. याची वेळीच दखल घेऊन भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहे.

निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार पाठिशी न घालता त्यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच दिले आहेत. दरम्यान, भिवंडीच्या अजयनगरमधील कचराकुंडीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे आधारकार्ड सापडले आहेत. या घटनेस अनुसरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनानेही कचराकुंडीत मोठ्याप्रमाणात सापडलेल्या या आधारकार्डच्या चौकशीचे आदेश भिवंडीचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना दिले आहेत. त्यामुळे संबंधीत आधारकार्ड बनावट आहे का, एवढ्या मोठ्याप्रमाणात कुंडीत सापडलेले कार्ड कशासाठी व कोणाकडे होते, या आधारकार्डवरील व्यक्ती अस्तित्वात आहेत की नाही आदी विविध प्रश्नांची उत्तरे चौकशीतून उघडकीस होण्याची शक्यता आहे.
आधारकार्ड जर बनावट असतील, तर त्यांचा बोगस मतदानासाठी वापर होणार होता की काय अशी चर्चाही या प्रकरणाने जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्हा प्रशासनानेही या आधारकार्डचा विषय गांभीर्याने घेऊन उपविभागीय अधिकाºयांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जारी केले. आचारसंहिता लागण्याच्या आधी आधारकार्ड कुंडीत सापडले आहेत. प्राप्त झालेल्या आदेशास अनुसरून निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाºयांच्या मंगळवारी बैठका घेण्यात आल्या असता त्यात याविषयी चर्र्चा झाली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. सर्व मुद्यांवर चौकशी करुन त्याविषयीचा सविस्तर अहवाल लवकरच वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे नळदकर यांनी सांगितले.

आधारकार्डधारकांचा पोलिसांकडून शोध
कचरा कुंड्यांमध्ये सापडलेले आधारकार्ड २०१५ सालचे आहेत. भिवंडी शहरातील खडक रोड, कोंबडपाडा, अजयनगर, गोकूळनगर आदी ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावाची आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी सुमारे ३०० ते ३५० आधारकार्ड कचराकुंडीतटाकणाºयांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्याविषयी सखोल चौकशी करण्यासाठी आधार कार्डवरील छायाचित्रांच्या सहाय्याने संबंधित कार्डधारकांचा शोध घेतला आहे. आता याप्रकरणी प्रशासन नेमका कसा चौकशी अहवाल देऊन कुणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Found cards in the fired trash; District Magistrate's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.