ठाण्यात पहिला कल अकरा वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:29 PM2019-05-21T23:29:42+5:302019-05-21T23:29:46+5:30

अंतिम निकालासाठी रात्र : लकी ड्रॉ काढून व्हीव्हीपॅट मोजणी; मतमोजणी केंद्रांत रंगीत पडदे

The first report of Thane at 11 pm of counting | ठाण्यात पहिला कल अकरा वाजता

ठाण्यात पहिला कल अकरा वाजता

Next

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली तरी पहिल्या फेरीचा निकाल येण्यास ११ वाजतील. त्यानंतर संपूर्ण निकाल जाहीर होण्यास किमान १२ तास लागतील. म्हणजे या वेळी लोकसभा निकाल जाहीर होण्यास रात्र होईल, अशी कबुली निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.


प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मोजणीला एक तास लागणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर लकी ड्रॉ काढून व्हीव्हीपॅटच्या मतदान केंद्रांची निवड केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.


स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन आणणारा शिपाई, कर्मचारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी टेबलवर जाऊन बसावे म्हणून त्यांना ज्या रंगाचे टीशर्ट दिले आहेत. त्याच रंगाचे पडदे त्या विधानसभा मतमोजणी बॅरेकला लावण्यात आलेले आहे.


ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घोडबंदर रोडवरील कावेसरच्या आनंद नगरमधील न्यू. होरयझन स्कॉलर्स स्कूल येथे २३ मे रोजी होणार आहे. तब्बल ११ लाख ६७ हजार २६५ मतांची मोजणी सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. या ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६७ हजार २६५ (४९.२५ टक्के) मतदान झाले आहे. यामध्ये सहा लाख ४७ हजार ४७१ पुरुष व पाच लाख १९ हजार ७७९ महिला मतदारांचा समावेश आहे. या वेळी पाच हजार २८३ टपाली मतदानापैकी आतापर्यंत तीन हजार २२३ टपाली मतदान प्राप्त झाले. सेना दलाच्या ६३० पैकी २३२ मते प्राप्त झाली. पोस्टाने येणारे मतदान २३ मे रोजी ७.५९ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहे.


ऐरोलीकरिता तब्बल ३३ फेऱ्यांत मोजणी
मीरा-भार्इंदर विधानसभेच्या ४२७ मतदान केंद्रांची तर ओवळा माजिवडा विधानसभेच्या ४३२ मतदान केंद्रांची मतमोजणी ३१ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल.
कोपरी पाचपाखाडीतील ३७२ मतदान केंद्रांवरील मतमोजणी २७ फेºयांमध्ये तर ठाणे विधानसभेची २८ फेºयांमध्ये मतमोजणी होईल, ऐरोलीच्या ४५२ मतदान केंद्रांची मतमोजणी ३३ फेºयांमध्ये होईल आणि बेलापूरच्या ३८६ मतदान केंद्रांची मतमोजणी २८ फेºयांमध्ये पूर्ण होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.


८४ टेबलवर मतमोजणी
मतमोजणी केंद्रांत एक हजार ४०० अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक विधानसभेच्या मतमोजणीच्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.
सहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी ८४ टेबलवर होणार आहे. प्रत्येक विधानसभेच्या २०० मतांसह सहा विधानसभेच्या एक हजार २०० मतांची एक फेरी यानुसार मतमोजणीची घोषणा केली जाणार आहे.
या मतमोजणी केंद्रांतील कर्मचाºयांचे प्रशिक्षण २२ मेला पुन्हा एकदा प्रशिक्षण होईल आणि मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता शेवटचे प्रशिक्षण होईल.

मतमोजणी केंद्रांच्यावर असलेल्या स्ट्राँगरुममध्ये २७ सीसीटीव्ही कॅमेरे असून मतमोजणी केंद्रांमध्ये ३६ सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीत मतमोजणी केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शैलेश किसनानी व संतोष कुमार माल या केंद्रीय निरीक्षकांना नियुक्त केले आहेत. चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होईल. तब्बल ७३० पोलीस अधिकारी व सीआरपीएफच्या ३० जवानांची व एसआरपीएफच्या ३० जवानाची तुकडी या मतमोजणी केंद्रावर तैनात आहे.


भिवंडीत मांडण्यात येणार ८४ टेबल
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल समजण्यासाठी मतदारांना मध्यरात्रीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतमोजणी व इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत निकालाला रात्री उशीर होईल, अशी माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी तालुक्यात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे पहाटे पाचपासून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. कपिल पाटील (भाजप), सुरेश टावरे (काँग्रेस),डॉ.अरूण सावंत(वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह पंधरा उमेदवार रिंगणात होते. सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबलप्रमाणे एकूण ८४ टेबल मांडण्यात येणार आहेत.
सर्वात कमी फेºया भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या २१ होणार आहेत. तर सर्वात जास्त फेºया मुरबाड विधानसभा क्षेत्राच्या ३५ होणार आहेत. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमच्या ३२, तर भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण व शहापूर यांच्या प्रत्येकी २५ फेºया होतील. सहा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी ५ अशा ३० व्हीव्हीपॅड मशीनच्या मतांची मोजणी होईल तसेच मतांच्या आकड्यांची बरोबरी तपासली जाईल, अशी माहिती जावळे यांनी दिली.
सर्वप्रथम टपाली व सेवा कर्मचाºयांच्या मतांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी सुमारे ४५० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये १०२ मतमोजणी सुपरवायझर, १०२ सूक्ष्म निरीक्षक व १५० सिलिंग कर्मचाºयांचा समावेश आहे. मतमोजणी केंद्राजवळ अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोवस्त ठेवला असून केंद्र व राज्य राखीव सुरक्षा दलासह सुमारे ४०० पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: The first report of Thane at 11 pm of counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.