ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:40 PM2018-01-19T14:40:52+5:302018-01-19T14:44:12+5:30

हरिनिवास सर्कल येथील २६ माळ्याच्या इमारतीला आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही.

Fire at Giriraj Heights building in Harinvivass circle in Thane | ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग

ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग

Next
ठळक मुद्देआग विझविण्याचे प्रयत्न सुरुआमदार निरंजन डावखरे यांचे देखील याच इमारतीत वास्तव्य

ठाणे - येथील हरिनिवास सर्कल जवळील गिरीजा हाईट्स या इमारतीच्या २६ व्या मजल्यावर दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या इमारतीच्या २५ व्या मजल्यावर कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे घर आहे. तर या इमारतीत अनेक प्रतितयश व्यक्तींचे वास्तव्य आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे, त्या ठिकाणी काही लोक अडल्याची भिती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे आणि बचावाचे कार्य सुरु झाले आहे.


 

Web Title: Fire at Giriraj Heights building in Harinvivass circle in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.