भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, उजागर डाईंगला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 09:31 AM2018-12-31T09:31:05+5:302018-12-31T11:57:19+5:30

भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire breaks out in a cloth factory in Bhiwandi. Three fire tenders present at the spot | भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, उजागर डाईंगला भीषण आग

भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, उजागर डाईंगला भीषण आग

googlenewsNext
ठळक मुद्देभिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 ते 13 डाईंग जाळून खाक झाले आहेत.

ठाणे - भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 ते 13 डाईंग जाळून खाक झाले आहेत. भिवंडी, कल्याण, एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. 




Web Title: Fire breaks out in a cloth factory in Bhiwandi. Three fire tenders present at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.