सराईत सोनसाखळीचे निघाले बाप-लेक; १४ गुन्ह्यांची दिली कबुली

By अजित मांडके | Published: January 13, 2024 04:32 PM2024-01-13T16:32:45+5:302024-01-13T16:33:25+5:30

वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कारवाई.

father and son theft golden chain after case registration both are confessed to 14 crimes | सराईत सोनसाखळीचे निघाले बाप-लेक; १४ गुन्ह्यांची दिली कबुली

सराईत सोनसाखळीचे निघाले बाप-लेक; १४ गुन्ह्यांची दिली कबुली

अजित मांडके, ठाणे : असे म्हटले जाते बापाच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा पुढे जातो. पण, ठाणे शहर पोलिसांनी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या कारवाईत सराईत चोरटे हे बाप-लेक असल्याचे समोर आले आहे. अंबिवली येथे राहणाऱ्या असिफ शब्बीर सैय्यद (६२) बागर आसिफ सैय्यद (३८) या दोघांनी १४ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये ५ लाख ४० हजार किंमतीचे १४१ ग्रॅम वजनाचे दागिने आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ ने ही धडक कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी ठाण्यातील इंदिरानगर येथून अटक केली. त्या दोघांच्या अधिक चौकशीत त्यांच्यावर ठाणे परिसरात चितळसर, कापूरबावडी, ठाणे नगर, वागळे, श्रीनगर, आदी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १४ दाखल गुन्ह्यामध्ये १२ सोनसाखळी चोरीचे तर फसवणूक आणि वाहन चोरीचा प्रत्येकी एका एका गुन्ह्याचा समावेश आहे. 

सोनसाखळीचे प्रत्येकी तीन गुन्हे श्रीनगर आणि वागळे पोलीस ठाण्यात, ठाणे नगर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक- एक तर चितळसर पोलीस ठाण्यात ४ आणि कापूरबवाडीत २ गुन्हे याशिवाय श्रीनगर पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा तर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल  आहे. त्या बाप लेकापैकी बापाला न्यायालयीन तर लेकाला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यातच त्यांच्यावर पूर्वी अनेक सोनसाखळीचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल का याचाही अभ्यास सुरू असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी दिली.

ठाणे- मुंबईत एकूण २३ गुन्हे :

असिफ आणि त्याचा मुलगा बागर या दोघांवर कुबली दिलेल्या गुन्ह्या व्यतिरिक्त ठाणे ग्रामीण आणि मुंबईत एकूण २३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये असिफ याच्यावर १८ तर मुलगा बागर यांच्यावर ५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मुंबईच्या सांताक्रूझ, मीरारोड, भायंदर, सह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: father and son theft golden chain after case registration both are confessed to 14 crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.