शेतकऱ्यांना पावला ‘राम’, कामातील अडथळे दूर, जमिनी देण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:41 AM2018-09-09T03:41:35+5:302018-09-09T03:41:37+5:30

मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही.

Farmers got 'Ram' to work, to overcome obstacles in the work, to give land | शेतकऱ्यांना पावला ‘राम’, कामातील अडथळे दूर, जमिनी देण्यास तयार

शेतकऱ्यांना पावला ‘राम’, कामातील अडथळे दूर, जमिनी देण्यास तयार

Next

बदलापूर : मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही. शेतकºयांना अपेक्षित असलेला मोबदला देण्यास सरकार तयार झाल्याने शेतकºयांनी आपल्या जमिनी देण्यास तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ मंत्रालयाकडून अंबरनाथ तालुक्यातील भूमी अधिग्रहण होणाºया २८७ शेतकºयांना भरघोेस मोबदला देत शेतकºयांच्या मागण्या पूर्ण केल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख व बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने दिलेल्या मोबदल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील सर्व शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकºयांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या जमिनी सरकारने अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे सात वर्षे हे शेतकरी सनदशीर मार्गांनी या मागणीचा पाठपुरावा पातकर यांच्या नेतृत्वाखाली करत होते. एकही आंदोलन न करता या पाठपुराव्याला यश आल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ विभागाने हे पैसे जाहीर केल्यानंतर शनिवारी बदलापूरमध्ये शेतकºयांनी कात्रप येथे एकत्र जमून आनंदोत्सव साजरा केला.
प्रस्तावित मुंबई-बडोदा महामार्गाचा मोठा भाग हा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून जाणार आहे. बदलापूरमधील चामटोलीपासून ते डोके, दापोली, एरंजाड, सोनिवली, बदलापूर गाव या पट्ट्यातून जाणारा हा मार्ग २०११ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केला होता. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रि या सुरू असताना अनेक शेतकºयांनी त्यावर आक्षेप घेत मोबदल्याची रक्कम जाहीर करण्याची मागणी केंद्राकडे करत होते.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने २०१३ मध्ये भूसंपादनाचा नवीन कायदा जाहीर केला. या कायद्यानुसारच शेतकºयांना मोबदला द्यावा, अशी मागणी पातकर यांनी लावून धरली होती. ही मागणी मान्य करण्यासाठी त्यांनी भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होते. गडकरी यांची दिल्लीत यासंदर्भात आठ ते दहा वेळा चर्चाही झाली होती. अखेर, सर्व वाटाघाटीनंतर शेतकºयांना सर्वोच्च मोबदला मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
>‘समृद्धी’पेक्षाही जास्त मोबदला
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गापेक्षाही जास्त मोबदला अंबरनाथ तालुक्यातील गावांना मिळणार असल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने मोबदला जाहीर केल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे आता या कामाला लवकरच गती मिळावी आणि शेतकºयांना लवकरात लवकर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करून जमीन अधिग्रहणाची प्रक्रि या करून या कामाची तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी पातकर यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक अविनाश पातकर, जयवंत मुठे, प्रभाकर पाटील यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बडोदा महामार्गाच्या मोजणीसाठी दोन वर्षापूर्वी सरकारने प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्थानिक शेतकºयांनी ही मोजणी बंद पाडली होती. त्यानंतर पुन्हा सरकारने चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांनी कायदेशीर मार्गाने लढा देत अधिकाधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या लढ्याला यश आले आहे.

Web Title: Farmers got 'Ram' to work, to overcome obstacles in the work, to give land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.