अभिनय कट्टा करणार प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेचा जागर, `माझी मराठी , आपली मराठी` 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:45 PM2019-03-02T16:45:18+5:302019-03-02T16:48:02+5:30

अभिनय कट्ट्याला आठ वर्षे पूर्ण होऊन कट्ट्याने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. 

In every English medium school to do acting, Marathi-language Jagar, 'My Marathi, your Marathi' | अभिनय कट्टा करणार प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेचा जागर, `माझी मराठी , आपली मराठी` 

अभिनय कट्टा करणार प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेचा जागर, `माझी मराठी , आपली मराठी` 

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्याने नवव्या वर्षात केले पदार्पण कट्टा करणार इंग्रजी शाळेत मराठी भाषेचा जागरनव्या उमेदीने नवव्या वर्षात पदार्पण करूया - किरण नाकती

ठाणे : कुसुमाग्रज जयंती म्हणजेच मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी २०११ रोजी अभिनय कट्ट्याची सुरुवात करण्यात आली आणि एकपात्री, द्विपात्री, एकांकिका,प्रायोगिक नाटक, नृत्य,पथनाट्य आशा कलाविष्कारांची पर्वणी घेऊन हा कट्टा अविरत ८ वर्ष न थांबता चालत आहे.आर्थिक, नैसर्गीक संकटांवर मत करत आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर किरण नाकती आणि कट्टेकरींनी हा प्रवास अविरत चालू ठेवला. नवव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या प्रवास अभिनय कट्ट्याचा या कार्यक्रमाची सुरुवात अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती आणि सर्व बालकलाकरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली.

          साई परब,सुशील परबळकर, प्रमोद पगारे,महेश रासने,शुभांगी भालेकर,उत्तम ठाकूर,डॉ.मौसमी घाणेकर,राजन मयेकर,आरती ताथवडकर,चिन्मय मौर्य, अमोघ डाके,श्रेयस साळुंखे,'सिंड्रेला' आणि 'लॉस्ट अँड फाउंड' प्रशांत सपकाळ,'यंटम फेम' अक्षय थोरात,रुक्मिणी कदम,गौरी घुले,रोहित कोळी ,अद्वैत मापगावकर व आदित्य नाकती आणि इतर अनेक कट्ट्याच्या कलाकारांच्या मनातील कट्टा,आदरणीय किरण नाकती सर आणि कट्टयासोबतचा प्रवासबद्दलचे मत व्यक्त केले. *एखाद्या कलाकाराला बोट धरून ह्या कलासृष्टीत धावायला शिकवताना सोबतच माणूस म्हणून अभिमानाने कसं जगावं ह्याची शिकवण हीच कट्ट्याची आम्हाला देणगी आणि आमचा आजवरचा कलासृष्टीतील प्रवासात अभिनय कट्टा आणि आदरणीय किरण नाकती ह्यांच श्रेय आहे आणि त्यासाठी आम्ही अभिनय कट्टा आणि गुरुवर्य किरण नाकती ह्यांचे शतशः ऋणी आहोत असे मत कलाकारांनी व्यक्त केले. 

कट्ट्यावर उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांपैकी काहींनी प्रेक्षक प्रतिनिधी म्हणून कट्टयाविषयी आपली भावना व्यक्त केली. एक प्रेक्षक म्हणून दर रविवारी मिळणारा आनंद, प्रबोधन आणि कट्ट्याचे कुटुंबीय म्हणून मिळणारा आपलेपणा जगायला वेगळी उमेद देऊन जातो, असे मत आशा राजदेरकर व मनीषा शितूत यांनी व्यक्त केले तसेच आम्हाला वार्धक्याने आलेलं आजारपण आम्ही विसरून जातो आणि दर रविवारी मनानं तरुण होतो असे मत ज्येष्ठ प्रेक्षक अच्युत वाकडे यांनी व्यक्त केले. आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी अभिनय कट्टा बालसंस्कारशास्त्र फक्त अभिनयचं नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुद्धा तितकाच जागरूक आहे आणि अभिनय कट्टा हे त्यांचे दुसरे घर झाले आहे असे मत बालसंस्कारशास्त्राच्या पालकांनी व्यक्त केले. अष्टवर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणजे आजवर पडद्यामागे उभे असणारे अभिनय कट्ट्याचे संचालक व नाट्य चित्रपट दिग्दर्शक किरण नाकती ह्यांची मुलाखत आणि ही मुलाखत कट्ट्याच्या ह्या आठ वर्षाचा साक्षीदार असलेला कलाकार कदिर शेख ह्याने घेतली. ह्या मुलाखतीत किरण नाकती सरांनी अभिनय कट्ट्याची सुरुवात ते आजवरचा प्रवासातील अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. त्यावेळी चांगले वाईट अनुभव येत असतातच आयुष्य असच जगायचं असतं पण वाईट अनुभव विसरून चांगले अनुभव सोबत घेऊन नव्या उमेदीने नवव्या वर्षात पदार्पण करूया असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

आज कट्ट्याचा कलाकार विविध क्षेत्रात विविध माध्यमात सहजपणे वावरतोय हेच अभिनय कट्ट्याचे यश आहे. सिंड्रेला हे ह्या प्रवासातील सोनेरी पान ,कट्ट्याच्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी देण्याचं स्वप्न सत्यात उतरलं आणि ह्या चित्रपटाची दखल महाराष्ट्र नव्हे तर अख्या जगाने घेतली.

       कट्टा हे नेहमीच प्रबोधनाचे माध्यम ठरलंय रेल्वे सुरक्षा, रस्ता सुरक्षा ट्राफिक किर्तन,रक्तदान,मोबाईल गैरवापर, अशा अनेक सामाजिक विषयावरील १५००हुन अधिक पथनाट्य अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी आजवर महाराष्ट्रभर केली आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातून चित्रपटसृष्टीत काम करायचं स्वप्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळालं त्यांचं समाधान हेच कट्टयाच आजवरचं यश .हजारो कलाकार अनेक कलाकृती हजारो पात्रे स्वतःच्या पदराखाली जपणारी मायमाऊली आमचा कट्टा ही आमच्यासारख्या कलाकारांची पंढरीच जणू असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. आजवरच्या ह्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक कलाकाराची आठवण किरण नाकती ह्यांनी ह्या क्षणाला केली. कट्ट्याचा लाडका कलाकार संकेत देशपांडे हे नाव येताच संकेतच्या आठवणीने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळले.ह्या यशस्वी वाटचालीत किरण नाकती सरांच्या सोबत असणारे कादिर शेख आणि संकेत देशपांडे. एक उत्तम लेखक,निवेदक ,कलाकार,अन कट्ट्यावरील सर्वांचं लाडका दादा ह्या वर्षात ह्या जगाचा रंगमंचावरून अचानक एक्झिट घेतली अन ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीतील एक नवीन उभारी घेणार एक स्वप्न मावळलं खरं पण अभिनय कट्टा संकेत देशपांडे हे नाव कधी विसरणार नाही अन ते रंगभूमीला विसरून देणार नाही आपला लाडका संकेत आपल्या सोबत आहे आणि असणार अस मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

          ह्या सर्व प्रवासात अभिनय कट्ट्यांने दिव्यांग मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून दिव्यांग कला केंद्र' सुरू करण्यात आलं आहे. विशेष मुलांचे विशेष कलागुण जपून त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याच्या दृष्टीने हे कला केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र मला ऊर्जा देतं , या प्रत्येक दिव्यांग मुलाला एक कलाकार म्हणून त्याची स्वतःची ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी इच्छा किरण नाकती यांनी व्यक्त केली. दिव्यांग कला केंद्र आणि अभिनय कट्टा ह्या चळवळीच्या यशामागे किरण नाकती सरांसोबत संध्या नाकती, परेश दळवी, महाजन काकू, वीणा टिळक या सर्व मंडळींचा मोठा वाटा आहे हे सांगायला किरण नाकती विसरले नाहीत. आजवरचा हा प्रवास सर्व रसिक प्रेक्षक, प्रसार माध्यमं, लोकप्रतिनिधी, ठाणे महानगरपालिका , मित्रपरिवार, सलग आठ वर्षे लाभलेला रसिक प्रेक्षक, ज्येष्ठ नागरिकांचा आशिर्वाद , अभिनय कट्टयावर सादरीकरण केलेल्या प्रत्येक कट्टेकऱ्यामुळेच मी न थांबता न थकता करू शकलो असे प्रामाणिक मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. हा अभिनय कट्टा आजवर अनेकांच्या स्वप्नांना बळ देऊन गेला अन पुढे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी साथ देत राहील.आणि उपस्थित प्रत्येक कलाकाराला आजवर सोबत होतो पुढेही असेंन कधीही हाक द्या आपला अभिनय कट्टा मायमाऊली होऊन सदैव आपणासोबत असेल असे प्रेमळ आश्वासन किरण नाकती ह्यांनी दिले.

          मराठी भाषा दिन व अभिनय कट्टा वर्धापनदिनाचे औचित्य साधून अभिनय कट्टयाच्या भविष्यातील प्रवासात, नवव्या वर्षात मराठी भाषा टिकवण्याच्या दृष्टीने किरण नाकती यांच्या संकल्पनेतून माझी मराठी, आपली मराठी या उपक्रमाला ठाण्यातील जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये सुरुवात होणार आहे. आपली मराठी भाषा टिकवायची असेल तर ती शाळेपासून रुजवायला हवंय या उद्देशाने किरण नाकती व त्यांच्या टीमने प्रत्येक शाळेत माझी मराठी, आपली मराठी या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला मराठी शालेय साहित्याची अभिवाचन स्पर्धा घेण्याचे आयोजन केले आहे व वर्षाअखेरीस या सर्व शाळांची मिळून वार्षिक अभिवाचन स्पर्धा घेण्यात येईल व त्या सर्व शाळेतील शिक्षकांचा व विजेत्यांचा सन्मान अभिनय कट्टयावर पुढच्या वर्षी अभिनय कट्ट्याच्या वर्धापनदिनी करण्यात येईल. सदर कट्ट्यावर देसी फिल्ममेकर आणि अभिनय कट्टा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लाइव्ह ह्या शॉर्टफिल्मचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले .

कार्यक्रमाच्या शेवटी अभिनय कट्ट्याच्या प्रवासाचे वर्णन करणारा प्रवास अभिनय कट्ट्याचा हा कार्यक्रम अभिनय कटट्ट्याच्या सर्व कलाकारांनी सादर केला.सादर कार्यक्रमाचे दिग्दर्शन कदिर शेख आणि परेश दळवी ह्यांनी केले.

सरते शेवटी जुन्या नव्या कलाकारांनी पुन्हा एकदा कट्ट्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.

Web Title: In every English medium school to do acting, Marathi-language Jagar, 'My Marathi, your Marathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.