ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'आयला गेम चुकला'ने उडवली धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 04:12 PM2019-02-26T16:12:55+5:302019-02-26T16:15:59+5:30

अभिनय कट्टा .. नवोदित कलाकारांसाठीचे एक खुले आणि हक्काचे व्यासपीठ किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही चळवळ 'मराठी भाषा दिनी' म्हणजेच येत्या २७ फेब्रुवारी २०१९ रोजी आठ वर्ष पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण करत आहे.

Thane's acting wasted due to 'Ayala Game' | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'आयला गेम चुकला'ने उडवली धम्माल

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'आयला गेम चुकला'ने उडवली धम्माल

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर 'आयला गेम चुकला'ने उडवली धम्माल गोष्ट चार मित्रांची त्यांच्या धम्माल मैत्रीची गोष्टअभिनय कट्टा ... २७ फेब्रुवारी २०१९ रोजी आठ वर्ष पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण 

ठाणे : आयला गेम चुकला* '..गोष्ट पळून जाण्याची तारीख विसरलेल्या एका जोडप्याची,, गोष्ट विसरलेल्या गाडीची.. गोष्ट एका दर्देदिल दयावान चोराची.. गोष्ट चार मित्रांची त्यांच्या धम्माल मैत्रीची गोष्ट आगळ्यावेगळ्या फसलेल्या पळवापळवीची.. अभिनय कट्टा क्रमांक ४१७ वर सादर झाला एक धम्माल विनोदी नाट्यविष्कार. *निलेश बोरकर लिखित आणि परेश दळवी दिग्दर्शित 'आयला गेम चुकला' ह्या धम्माल एकांकिकेचे सादरीकरण झाले.

        सादर एकांकिकेत पदया त्याची प्रेयसी ठकी हिला पळवून नेण्याची तयारी करत असतो त्याचे मित्र रव्या,चंदया आणि शिऱ्या त्याला मदत करणार असतात.पण ऐन वेळेला विसराळू चंदया लग्नाचं सामानच आणायला विसरतो आणि पळून जाण्यासाठी शिऱ्या गाडी आणू शकत नाही आणि ट्रेन, बस, रिक्षाच्या अचानक संपामुळे गोंधळ उडतो.पळण्याचं रद्द करून ते ठकीला कस कळवायच ह्याचा विचार होत असताना एक  दर्देदिल चोर घरात शिरतो पद्याची दया येऊन  तो मदतीला तयार होतो पण पद्याने दिलेल्या ठकीच्या चुकीच्या पत्त्यामुळे चोर बेदम मार खाऊन पळून जातो.पदया प्रत्येक वेळेला देवाला वाचवण्यासाठी म्हणजे गेम फिरवण्यासाठी प्रार्थना करतो.दरम्यान ह्या चार जणांना समजत की आपण चुकीच्या तारखेला पळून जाण्याची तयारी करतोय पण पळून तर दुसऱ्या दिवशी जायचय हा सावळा गोंधळ संपतो न संपतो पद्याची ठकी पण तारीख विसरून तिथे पळून येते आणि गुंता आणखीन वाढतो शेवटी निराश पदया देवा अस का केलस असा गेम का फिरवलास असा प्रश्न  देवाला विचारतात तेव्हा देव म्हणतो 'आयला गेम चुकला'. लेखक निलेश बोरकर ह्यांचे भन्नाट संवाद परेश दळवीच त्याला साजेस दिग्दर्शन आणि सोबत शनि जाधवचा 'पदया' ,न्यूतन लंकेची 'ठकी' , अभय पवार चा 'रव्या', सहदेव साळकर चा 'शिऱ्या', परेश दळवीचा 'चंदया' आणि शुभम कदमचा 'चोर' कुंदन भोसलेच्या संगीत आणि अजित भोसले ह्यांच्या प्रकाश योजनेसोबत अवतरले आणि अभिनय कट्ट्याच्या रंगमंचावर फुल टू धम्माल 'आयला गेम चुकला' एकांकिका सादर झाली. `आयला गेम चुकला` ही एकांकिका अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक वेळा विविध संचामध्ये सादर झाली प्रत्येक वेळी नविन संचाने धम्माल सादरीकरण केले ह्या संचानेही तितकीच धम्माल केली.असे अनेक नाट्याविष्कार आजवर अभिनय कट्ट्यावर सादर झाले अनेक एकांकिका अनेक एकपात्री , अनेक द्विपात्री, अनेक स्किट,नृत्य,संगीताचे कार्यक्रम,अभिवाचन,दिव्यांग मुलांचे कार्यक्रम सादर झाले अन ते असेच सादर होत राहणार कारण रसिकांचे मनोरंजन हाच आम्हा कट्टेकऱ्यांचा धर्म हाच आमचा ध्यास आणि रसिक मायबापांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची ताकद .हा प्रवास आठ वर्षाचा होत आहे ४१७ कट्टे झाले हा प्रवास निरंतर चालू राहणार साथ हवी ती रसिक माय बाप प्रेमाची आशीर्वादाची कौतुकाची म्हणूनच  आपल्या अभिनय कट्ट्याच्या अष्टपुर्ती सोहळ्याला आपण सर्व रसिक प्रेक्षक म्हणजेच अभिनय कट्ट्याच्या कुटुंबीयांनी गुरुवार दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अभिनय कट्ट्यावर उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याचा कलाकार कादिर शेख ह्याने केले.

Web Title: Thane's acting wasted due to 'Ayala Game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.