दसरा मेळाव्याची धुरा शिंदेंवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:22 AM2018-10-18T00:22:58+5:302018-10-18T00:23:11+5:30

ठाणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्यामुळे हा ...

Dussehra rally on Shinde shoulder | दसरा मेळाव्याची धुरा शिंदेंवर

दसरा मेळाव्याची धुरा शिंदेंवर

Next

ठाणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्यामुळे हा मेळावा हे एक प्रकारे शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन असणार आहे. जिल्ह्यातून किमान एक हजार बसगाड्या भरून शिवसैनिक व शिवसेनाप्रेमी नागरिक शिवाजी पार्कवर नेण्याकरिता शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत.


जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख या सर्वांवर मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांकरिता सण असतो. यंदाचा मेळावा हा लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मेळावा आहे. लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर त्याही निवडणुकीचे रणशिंग याच मेळाव्यात फुंकले जाणार आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला खिंडीत गाठण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. अयोध्येत जाऊन राम मंदिर उभारणीच्या लढ्याचे नेतृत्व ठाकरे करणार असतील, तर त्याकरिता कुमक ठाण्यातूनच रवाना होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुदलात ठाणे व शिंदे यांच्यावर येत्या काळातील घडामोडींत मोठी जबाबदारी राहणार आहे.


ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातून हजारो सेना पदाधिकारी मेळाव्यासाठी कामाला लागले आहेत. ठाणे शहरातील प्रत्येक नगरसेवकावर दोन बसगाड्या भरून माणसे आणण्याची जबाबदारी दिली आहे. काहींनी स्वत:हून १० बसगाड्या भरून माणसे आणण्याचे आश्वासन शिंदे यांना दिले आहे. त्यानुसार, एकट्या ठाणे शहरातून सुमारे ४०० बस मेळाव्याला जाणार आहेत. मीरा-भार्इंदरची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सोपवण्यात आली असून येथून १०० बसगाड्या जाणार आहेत. नवी मुंबईतून २०० ते २५० बस, कल्याण लोकसभा मतदासंघातून ३५० ते ४०० बस आणि उर्वरित ग्रामीण भागातून १०० च्या आसपास बसगाड्या अशी एक हजार २५० बसगाड्या नेण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Dussehra rally on Shinde shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.