ठाण्यात वातानुकूल यंत्राची दुरुस्ती दरम्यान झालेल्या स्फोटात तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:29 PM2018-01-23T22:29:05+5:302018-01-23T22:39:28+5:30

ठाण्याच्या वसंतविहार परिसरातील एका जीमच्या वातानुकूल यंत्राची दुरुस्ती करतांना झालेल्या स्फोटामध्ये दुरुस्ती करणा-या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

During the blast during the amendment to the Air Conditioning Corp in Thane, the death of the technologist on the spot | ठाण्यात वातानुकूल यंत्राची दुरुस्ती दरम्यान झालेल्या स्फोटात तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु

तीन कामगार किरकोळ जखमी

Next
ठळक मुद्देजीममधील एसीमध्ये झाला होता बिघाडगॅसचे प्रेशर वाढल्याने झाला स्फोटतीन कामगार किरकोळ जखमी

ठाणे: वसंतविहार परिसरातील नविन म्हाडा वसाहतीमधील एका खासगी जीमच्या (व्यायाम शाळेचे) वातानुकूल यंत्र दुरुस्ती करणा-या सागिर अन्सारी (२२, रा. कुर्ला) या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अगदी अलिकडेच ‘सिद्धांचल क्लब’च्या जवळ असलेल्या नविन म्हाडा वसाहतीमध्ये अजित जाधव यांनी पहिल्या मजल्यावर जिम सुरु केली आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर पार्र्किंग असून पहिल्या मजल्यावर ही जीम आहे. जीमच्या वातानुकूल यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नाहूर इलेक्ट्रॉनिक्सच्या तंत्रज्ञांना पाचारण केले होते. चौघांपैकी सागीर अन्सारी हा वातानुकूल यंत्रामध्ये गॅस भरणा करीत असतांनाच गॅसचा दाब वाढला. त्यातूनच यंत्रामध्ये स्फोट झाल्याने तो पहिल्या मजल्यावरील खिडकीतूनच खाली फेकला गेला. खाली कोसळल्यामुळे डोक्यावर आपटल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत मदतकार्य केले. अग्निशमन दल आणि चितळसर पोलिसांनीही मदतकार्य केले. या घटनेत गोलू चौधरी (१९), अविनाश मौर्या (२४) आणि अंकित सिंग (२०) हे तिघे तंत्रज्ञ किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बिघडलेले एसी दुरुस्ती नेमकी कशाप्रकारे करावी, हा यक्ष प्रश्न असल्याचीही प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, सागिर अन्सारी या तंत्रज्ञाच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: During the blast during the amendment to the Air Conditioning Corp in Thane, the death of the technologist on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.