डम्पिंगची आग धुमसतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:24 AM2018-10-18T00:24:33+5:302018-10-18T00:24:46+5:30

धुराचे साम्राज्य : ३० ते ४० हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका

Dumping fire | डम्पिंगची आग धुमसतेय

डम्पिंगची आग धुमसतेय

Next

उल्हासनगर : डम्पिंगवरील आग विझत नसल्याने धुराने ३० ते ४० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी वज्र संघटना व अन्यायविरोधी संघर्ष समितीच्या वतीने १९ आॅक्टोबरला पालिकेसमोर उपोषण करणार आहेत.
उल्हासनगरमध्ये डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून डम्पिंगला लागत असलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. पालिका डम्पिंगवरील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना काही प्रमाणात यश येत असले, तरी पुन्हा आग लागत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. कचऱ्याचे विघटन करण्यासाठी २२ लाखांच्या निधीतून बायोतंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर तब्बल साडेतीन कोटींच्या खर्चाला मागील आठवड्यात स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समितीच्या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका होत असून विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी सपाटीकरणाच्या प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी केली. सपाटीकरणासाठी वापरण्यात येणाºया पोकलेन व जेसीबी मशीनची किंमत साडेतीन कोटी नसल्याची टीका होत आहे.
डम्पिंगवरील आगीच्या धुरामुळे गायकवाडपाडा, महात्मा फुलेनगर, खडीखदाण, टँकर पॉइंट, दुर्गापाडा आदी परिसरांतील ३० ते ४० हजार नागरिकांना धुरांचा त्रास सुरू झाला. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकल्याने डम्पिंग हटवण्याची मागणी परिसरातून होत आहे.
स्थानिक नगरसेवक संतरामदास जेसवानी, कविता गायकवाड, विकास पाटील आदींनी डम्पिंग हटविण्याबाबत ठिय्या आंदोलनासह उपोषण केले. नगरसेवक किशोर वनवारी, समाजसेवक पी.एस.अहुजा , प्रमोद टाले, विजय पाटील आदींनी पालिका आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरून आणि महासभेत ठिय्या आंदोलन करून डम्पिंग हटविण्याची मागणी केली. सामाजिक संघटना वज्र यांनीही डम्पिंगबाबत पालिकेसह सरकारकडे पाठपुरावा केला आहे. उसाटणे येथील डम्पिंग मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

Web Title: Dumping fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.