डोंबिवलीत इमारतीचा पिलर कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:56 AM2017-10-28T01:56:48+5:302017-10-28T06:46:14+5:30

डोंबिवली- शहराच्या पश्चिमेला देवीचौक येथील नागूबाई निवास या इमारतीच्या पिलरचा एक भाग खचला असून त्यास तडा गेला आहे.

Dumbvlyit pillar collapsed building, luckily there is no life threatening | डोंबिवलीत इमारतीचा पिलर कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

डोंबिवलीत इमारतीचा पिलर कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

Next

डोंबिवली- शहराच्या पश्चिमेला देवीचौक येथील नागूबाई निवास या इमारतीच्या पिलरचा एक भाग खचला असून त्यास तडा गेला आहे. शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना लक्षात आली, रहिवाश्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले, आणि त्यानंतर इमारतीमधील सुमारे 72 कुटुंबियांना बाहेर काढणतात आले. सुमारे 35 वर्ष जुनी ही इमारत असून जोशी नामक या इमारतीचे मालक आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड तणाव, घबराहट पसरली आहे. घरातील सर्व सामान घरातच असून इमारत पूर्न रिकामी करण्यात आली आहे. घटनास्थळी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पीआय देशमुख, अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी येत असल्याची माहिती भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी दिली. भाडेकरू आणि मालक दोघेही घटनास्थळी असून केडीएमसीचे प्रभाग अधिकारी वानखेडे, तसेच ग प्रभागाचे परशुराम कुमावत यांनी घेतली रहिवाश्यांची भेट, उद्या नोटीस देऊन तातडीने घर रिकामी करण्याचे सांगण्यात येणार. मालकालाही नोटीस देण्यात येणार असून भाडेकरू आणि घरमालक यांनी सामंजस्याने तिढा सोडवावा असे आवाहन करण्यात आले. सर्व भाडेकरू आपापल्या जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळींकडे निवासाला गेली असून स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक, काँग्रेसचे युवानेते अमित म्हात्रे, केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक दीपेश म्हात्रे, एसीपी रवींद्र वाडेकर घटनास्थळी येऊन गेले.

Web Title: Dumbvlyit pillar collapsed building, luckily there is no life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.