- पंकज पाटील
बदलापूर : मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण अतिउत्साही पर्यटकांच्या दंगा मस्तीमुळे अनेक दुर्घटना घडतात. यंदाच्या मोसमात जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांचा बळी गेला आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर ही दोन ठिकाणे पर्यटकांयाठी हॉट डेस्टीनेश आहे. यातबदलापूर ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे कोंडेश्वर. अवघ्या १५ फुटांवरून वाहणाºया या धबधब्यात आतापर्यंत असंख्य जीव गेले आहेत. गेल्या वर्षी याच धबधब्यात ८ जणांनी जीव गमावले होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्वत्र तारेचे कुंपण घातले. त्यामुळे यंदा येथील भोज धरणाला पंसती मिळाली. बदलापूरचा चंदनसिंग रावत (२३) हा मित्रांसह भोज धरणाच्या बंधाºयावर उभे राहून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
पाण्याचा वेग ठरतो जीवघेणा
टिटवाळा : मानिवली गावालगत वाहणाºया उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी सादाब मुताईत शेख (१२) याचा ३० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीचे पात्र हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तरीही, लोक पात्रात उतरून मृत्यूला कवटाळतात.
उपचाराची संधी आणि सोय नाही
शहापूर : शहापूर तालुक्यात अनेक लहानमोठी पर्यटनस्थळे आहेत. तानसा, वैतरणा, भातसा हे तीन जलाशय आहेत. निसर्गरम्य माहुली गड आणि आजोबा पर्वत हे प्रमुख आकर्षण आहे. विद्युतनिर्मितीचा घाटघर जलविद्युत प्रकल्प आणि तानसा अभयारण्य आहे. याखेरीज माहुलीजवळ कसारा, डोळखांब परिसरात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे येथून पर्यटक आणि हौशी गिर्यारोहक येतात. अतिउत्साह, मद्यप्राशन करून धाडस दाखवण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटनस्थळी दुर्घटना घडतात.
शहापूर तालुक्यातील या पर्यटनस्थळांपाशी अपघात घडला किंवा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, तर तातडीने चांगल्या इस्पितळात दाखल करण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. परिणामी, एकट्या जुलै महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.