दुर्धर आजाराला कंटाळून ठाण्यात विवाहितेची उपवन तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 09:47 PM2019-05-01T21:47:21+5:302019-05-01T21:53:34+5:30

आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे फोनवरुन भावाला सांगून रुपादेवी पाडा, इंदिरानगर येथील ढेकणी यादव या विवाहितेने उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

Due to ill health, married woman comitted suicide in the lake | दुर्धर आजाराला कंटाळून ठाण्यात विवाहितेची उपवन तलावात आत्महत्या

आत्महत्येपूर्वी केला भावाला फोन

Next
ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआत्महत्येपूर्वी केला भावाला फोन तीन तासांच्या शोध कार्यानंतर मिळाला मृतदेह

ठाणे: क्षय रोगा (टीबी) सारख्या दुर्धर आजाराला कंटाळून ढेकणी जगदारी यादव (४९, रा. इंदिरानगर, रुपादेवी पाडा क्र. २, ठाणे) या विवाहितेने उपवनच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तब्बल तीन तास शोध घेऊन ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ढेकणी हिला गेल्या २० वर्षांपासून टीबीच्या आजाराने ग्रासले होते. टीबीवरील रोजच्या औषधाला आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे तिने ३० एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास भाऊ संतोष यादव (३९) याला फोनवरुन सांगितले. त्याआधी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास उपवनला जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. भावाला फोन केला त्यावेळी त्याच्यासोबत तिचे पती जगदारी (४९) हे देखिल मुलूंड येथे होते. भाऊ रिक्षा चालक असून जगदारी हे एका स्टील कंपनीत नोकरीला आहेत. गेली तीन महिने मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. चारच दिवसांपूर्वी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. नेहमीच्या आजारामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने तिने अखेर उपवन तलावात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. तिचा फोन आल्यामुळे धावाधाव करीतच भाऊ आणि पतीने वर्तकनगर पोलिसांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने रात्री ९ ते १२ या दरम्यान उपवन तलावात तिचा शोध घेतला. अखेर १२ वा. च्या सुमारास तिचा देह मिळाल्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी बुधवारी सकाळी नातेवाईकांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Due to ill health, married woman comitted suicide in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.