नेते काढताहेत एकमेकांची औकात, कलगी-तुऱ्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:04 PM2019-04-20T23:04:02+5:302019-04-20T23:05:01+5:30

निवडणूक लोकसभेची पण जुंपली विधानसभेची

Drawing leaders, each other's accent, crew and tricks | नेते काढताहेत एकमेकांची औकात, कलगी-तुऱ्यांना वेग

नेते काढताहेत एकमेकांची औकात, कलगी-तुऱ्यांना वेग

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यात निवडणूक प्रचारानिमित्त चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर जहरी टीका करत औकात काढण्यासह आव्हानांची भाषा वापरली जात आहे. निवडणूक लोकसभेची असली, तरी प्रचाराचा धुराळा मात्र विधानसभा निवडणुकीचा उडू लागला आहे.

मुझफ्फर यांनीच शहरातील राष्ट्रवादी आणि नाईक कुटुंबीयांची ताकद संपवल्याचे सांगत, असा मित्र असेल तर दुश्मनाची गरज नाही, असे म्हटले होते. विधानसभेचे इच्छुक उमेदवार मुझफ्फर यांनीसुद्धा शहराचा चौकीदार चोर नव्हे तर डाकू असल्याची झोड उठवली होती. एका सभेत मुझफ्फर यांनी पंतप्रधान मोदींना लोकांना फसवणारे जुमलेबाज तसेच चोर, चिटर, लबाड आदी उपमा दिल्या होत्या. दिल्लीतले नालायक आणि नालायकाचं पोर पण नालायक अशा शेलक्या शब्दांत त्यांनी आ. मेहतांवरही टीका केली होती. मेहतांची औकात १५ लाखांवरून ५०० कोटी कशी झाली? इमानदारीने पैसे कमवून झाले का? कचºयाचे ४० कोटींचे टेंडर यांनीच घेतले. पालिकेत पैसे नाहीत म्हणून लोकांवर घनकचरा शुल्क लादले. बिल्डरांसाठी रस्ते, गटार, पाणी सर्व सहज देतात. काँग्रेसचे नगरसेवक फोडायला एक कोटीची ऑफर देतात. हे स्वत:च्या खिशातून पैसे देणार आहेत का, अशा प्रश्नांचा भडिमार मुझफ्फर यांनी केला होता. भाजपचे निम्मे नगरसेवक हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत, असे ते म्हणाले होते. मुझफ्फर यांच्या टीकेला आ. मेहतांनीसुद्धा जळजळीत उत्तर दिले आहे. आपली औकात काढणाऱ्या मुझफ्फर यांना जनतेने गेल्या काही निवडणुकांमध्येच औकात दाखवली आहे. मोदींवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही आ. मेहतांनी दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच पुन्हा त्यांना औकात दाखवेल, असा इशारा दिल्याने ते बिथरले आहेत. म्हणूनच, लोकसभेची निवडणूक असताना विचारेंवर बोलण्याऐवजी माझ्यावर बोलत आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांना एक कोटी सोडा, चारआणेसुद्धा मी देणार नाही, अशी टीका मेहता यांनी केली.

जकात मुझफ्फर यांनीच लादली. कचºयाचा ठेका आजही त्यांच्याच काळातला सुरू आहे. अजून कायकाय केले आहे, त्याची जंत्रीच माझ्याकडे आहे. मी नगरसेवक नव्हतो, तेव्हा पण माझ्याकडे मर्सिडीज गाडी, ब्ल्यूमून क्लब, बॉम्बे मोटर्स आदी होते. क्लबच्या उद्घाटनास मुझफ्फरही होते. पण, तुमच्याकडे अस्मिता क्लब, मार्केट आदी कसे आले? मला तुमची औकात काढायला लावू नका, असा इशारा आ. मेहतांनी दिला.

ब्ल्यू फिल्म विकणारा व रिक्षा चालवणारा
आमदार प्रताप सरनाईक आणि आ. मेहतांची एकमेकांवर ब्ल्यू फिल्म विकणारा व रिक्षा चालवणारा यापासून झालेली आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक शहराने नुकतीच पाहिली होती. आता विधानसभा निवडणुकीआधीच आ. मेहता आणि मुझफ्फर यांच्यात एकमेकांची औकात काढण्यापासून चिखलफेक सुरू झाली आहे. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. मेहतांनी मुझफ्फर हुसेन यांना टोले लगावले होते.

Web Title: Drawing leaders, each other's accent, crew and tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.