शौचालयाच्या वादातून परदेशातून परतलेल्या तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 05:00 PM2018-01-25T17:00:21+5:302018-01-25T17:11:22+5:30

घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता.

The death of a stranger returned to the country from toilet issues | शौचालयाच्या वादातून परदेशातून परतलेल्या तरुणाची हत्या 

शौचालयाच्या वादातून परदेशातून परतलेल्या तरुणाची हत्या 

googlenewsNext

 

अंबरनाथ - घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने  दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता. दोन दिवसानंतर तो पुन्हा परदेशात कामासाठी जाणार होता. त्या आधीच त्याची हत्या झाल्याने अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात वातावरण तंग झाले आहे. 

रिजवान अब्बास शेख (27) हा मुळचा उलनचाळ येथे राहणार तरुण कामानिमित्त परदेशात असतो. त्याचा विवाह निश्चित झाल्याने त्यासाठी तो कामावरुन सुट्टी घेऊन अंबरनाथमध्ये आला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह देखील निश्चित झाला होता. पुन्हा लगनसाठी घरी यावे लागणार असल्याने दोन दिवसात तो पुन्हा परदेशात कामानिमित्त जाणार होता. मात्र बुधवारी सायंकाळी रिजवाज आणि त्याचा शेजारी राहणारा खालीद सैय्यद यांच्यात शौचालयाच्या वादातून भांडण झाले. या आधी देखील त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद जिवघेणा ठरेल असे रिजवानला कधी वाटले देखील नव्हते. बुधवारी पुन्हा रिजवान आणि खालीद यांच्यात वाद झाल्यावर खालीदने रिजवानच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन त्याला जखमी केले.
रिजवान खाली पडल्यावर त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकुने वार करुन खालीद पळून गेला. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या रिजवानला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू ओढावला. या हत्येनंतर पोलीसांनी खालीद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: The death of a stranger returned to the country from toilet issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.