ठाण्यात ट्रकच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:01 PM2018-12-02T22:01:53+5:302018-12-02T22:11:14+5:30

ठाण्यातील विवियाना मॉलसमोरील नाशिक मुंबई महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला मालवाहू ट्रकची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा यात मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

Death of a pedestrian woman in Thane by truck | ठाण्यात ट्रकच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यु

पोलिसांनी ट्रक केला जप्त

Next
ठळक मुद्दे अपघातानंतर चालकाचे पलायनराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हापोलिसांनी ट्रक केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मालवाहतूक करणा-या एका ट्रकच्या धडकेने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना कॅडबरी उड्डाणपूलाच्या उतारावर रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालक मात्र पसार झाला आहे.
मुंबई ते नाशिक जाणा-या दू्रतगती मार्गावर विवियाना मॉलसमोरील कॅडबरी ब्रिजच्या उतारावर एमएच- ०४-एफजे- ४९२७ या क्रमांकाच्या मालवाहतूक करणाºया ट्रकने रस्ता ओलांडणाºया ५५ वर्षीय महिलेला जोरदार धडक दिली. यात ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जखमी महिलेला कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता ट्रक चालकाने मात्र ट्रक सोडून तिथून पलायन केले.
......................
नातेवाईकांचा शोध सुरु
अपघातात मृत्यु पावलेल्या महिलेचे वय महिला अंदाजे ५५ वर्षीय आहे. उभट चेहरा, बसके नाक, तपकीरी डोळे, अर्धवट पिकलेले केस, मानेखाली आणि छातीखाली अर्धगोलाकार गोंदलेले तसेच नेसूस हिरव्या रंगाची साडी त्याला लाल रंगाचा पदर त्यावर सोनेरी रंगाची नक्षी अशा वर्णनाच्या या महिलेची किंवा तिच्या नातेवाईकांची कोणाला माहिती असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन ठाण्यातील राबोडी पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: Death of a pedestrian woman in Thane by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.