लैंगिक छळवणूक प्रकरणी कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 07:48 PM2018-11-29T19:48:27+5:302018-11-29T19:53:36+5:30

पूर्वीप्रमाणेच आपल्याशी मैत्रि करावी, अशी गळ घालीत आपल्या सहकारी महिलेशी अश्लील वर्तन करीत तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देणाºया अभिशेषकुमार शर्मा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी अटक केली आहे.

Custody of a corporate company officer arrested for sexual assault | लैंगिक छळवणूक प्रकरणी कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा

Next
ठळक मुद्दे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपतीलाही ठार मारण्याची दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक करुन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणा-या अभिशेषकुमार शर्मा (३८, रा. बाळकूम, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये हे दोघेही नोकरीला असून शर्मा या कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे. आधी त्यांच्यात चांगली मैत्रीही होती. त्याच्या विचित्र वागणूकीमुळे आणि ‘अपेक्षे’मुळे या महिलेने त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिने पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्याशी मैत्रिचे संबंध ठेवावेत. यासाठी त्याच्या वेगवेगळया मोबाईल फोनवरुन त्याने तिच्या मोबाईलवर वारंवार फोन केले. तसेच तिच्या मेल आयडी आणि व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करुन तिला तसेच तिचे पती, आई, सासू, सासरे, नणंद आदींना शिवीगाळ केली. कहर म्हणजे तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटूंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. प्रचंड मन:स्ताप झाल्याने या महिलेने अखेर कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Custody of a corporate company officer arrested for sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.