छट पुजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:03 PM2018-11-10T15:03:48+5:302018-11-10T15:05:41+5:30

ज्या पध्दतीने मराठी सणांवरुन निर्बंध लादले जातात, ते इतरांच्या बाबतीत होत नाहीत. गणेशमुर्तींचे विसर्जन हे कृत्रीम तलावातच करा असे सांगितले जाते. मात्र छट पुजेसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या विद्यार्थी सेनेने महापालिकेला एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार यासाठी सुध्दा कृत्रीम तलाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

The creation of artificial lakes for Chhat Puja, the demands of the MNS student's municipal corporation | छट पुजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे महापालिकेकडे मागणी

छट पुजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे महापालिकेकडे मागणी

Next
ठळक मुद्देइतरांना वेगळा न्याय कशासाठीआता तलाव प्रदुषित होत नाहीत का?

ठाणे - छट पूजेच्या निमित्ताने तलावांमध्ये मोठया प्रमाणात निर्माल्य टाकले जाते. तलाव परिसरात अस्वच्छता पसरते हे सर्व रोखणे गरजेचे आहे. गणेशोत्सव काळात ज्या प्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली जाते त्या धर्तीवर छट पूजे करिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाच्या वतीने ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.
दरवर्षी ठाण्यात गणेशोत्सव, दहीहंडी तसेच नवरात्रोत्सव आले की ठाणे महापालिकेकडून प्रदुषण, सुरक्षा पाण्याचा अपव्यय इतर कारणे देत मराठी सणांवर बंदी तसेच मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जातो. दहीहंडीत पाणी वापरू नका, डीजे लावु नका, गणेशोत्सवात विसर्जन तलावात करू नका तलाव प्रदुषित होतात मग छटपुजा तलावात तसेच परिसरात कशी साजरी केली जाते. निर्माल्य इतरत्र कसेही टाकले जात असताना कोणीही (महापालिका अधिकारी) का बोलत नाही? त्यांच्यावर नियम कायदे का लागु होत नाहीत?
                       गणेशोत्सव कृत्रिम तलावत साजरा करा म्हणणारे त्यांना का नाही कृत्रिम तलावात छटपुजा साजरी करा. तलावात प्रदुषण करू नका असे सांगत नाहीत, आता सगळे गप्प का, असा प्रश्न महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाच्या वतीने ठाणे महापालिकेला विचारण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी उपवन परीसरात छट पुजा झाल्यानंतर त्या परिसरात जी अस्वच्छता पसरते त्यामुळे प्रदूषण होते ते रोखण्यासाठी गणेशिवसर्जनासाठी जसे कृत्रीम तलाव बांधण्यात येतात त्याच धर्तीवर या छट पूजेसाठी ते बांधावे अशी मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहराध्यक्ष दीपक जाधव पुष्कराज विचारे यांनी यांनी वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून छट पूजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे. एकीकडे मराठी सणांवर निर्बंध घालताना इतरांना मात्र त्यात सूट देण्यात येते यावरून आपल्याच घरात हाल सोसते मराठी हे वाक्य सध्या महापालिका खरे ठरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


 

Web Title: The creation of artificial lakes for Chhat Puja, the demands of the MNS student's municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.