खंडणीवसुलीसाठी केली व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:32 AM2018-07-16T03:32:45+5:302018-07-16T03:32:48+5:30

अक्कलकुव्याच्या व्यापा-याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या ‘त्या’ तरुणीने हा कट सफल होण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी त्याच व्यापा-याविरुद्ध तक्रारही केली होती.

Complaint against trader made for ransom | खंडणीवसुलीसाठी केली व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार

खंडणीवसुलीसाठी केली व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार

Next

- जितेंद्र कालेकर 
ठाणे : लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी देत अक्कलकुव्याच्या व्यापा-याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या ‘त्या’ तरुणीने हा कट सफल होण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी त्याच व्यापा-याविरुद्ध तक्रारही केली होती. या तरुणीसह तिला मदत करणारा रिक्षाचालक तसेच येऊरच्या बंगल्यावर आलेले अन्य दोघेजण असे कोणीही पोलिसांच्या अद्याप हाती लागलेले नाही.
व्यापारी रिजवान मेमन (२२) आणि त्याचा मित्र एजाज नुरू (२३) या दोघांना खंडणीसाठी ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार ९ आणि १० जुलै रोजी घडला. याप्रकरणी पोलिसांनी दीपक वैरागड आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी याला आधीच अटक केली आहे. रिजवानकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला आधी सोहेल पंजाबीच्या मैत्रिणीमार्फत ‘सेक्स’च्या जाळ्यात अडकवण्यात आले. ९ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ‘त्या’ तरुणीसोबत ते येऊरला गेले. तेव्हा त्यांना येऊरला नेणाºया रिक्षावाल्यानेच बंगल्याची सोय करून दिली. त्याबदल्यात त्याने चार हजार रुपये सांगितल्यानंतर त्याला एक हजार रुपये रिजवानने दिले.
बंगल्यावर त्यांच्यात ‘संबंध’ आल्यानंतर दुसºयाच मिनिटांत तिथे दरवाजावर दीपक वैरागडसह तिघांनी थाप मारत धाड टाकली. त्यानंतर, दोघा कथित पोलिसांनी त्याच रिक्षाचालकासह तिला तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेले. रिजवान आणि बंगल्याबाहेर थांबलेला एजाज यांना दीपकने दम देण्यास सुरुवात केली. त्यावेळी दीपकने रिजवान आणि एजाजला वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांना बाहेरच बसवून पुन्हा धमकावून रिजवानकडून १० हजार रुपये काढले. नंतर, त्याला आणखी १० लाखांच्या रकमेसाठी धमकावण्यात आले. त्यासाठी त्याला काल्हेर येथील लॉजवर ठेवून दीपकने त्यांना ९ जुलैच्या रात्री त्यांच्यावर टेहळणी केली. दुसºया दिवशी १० जुलैला पुन्हा त्यांना ताब्यात घेऊन वाशीला दोन लाख रुपये आणण्यासाठी नेल्यानंतर दरम्यानच्याच काळात या कटातील ‘त्या’ तरुणीने मंगळवारी रिजवानविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात रिजवानविरुद्ध अदखलपात्र तक्रार (एनसी) दाखल केली. त्यामुळे आपली तक्रार कशी खरी आहे, हे भासवून त्यांना रिजवानकडून पैसे काढता येणे शक्य होईल, असा त्यामागे हेतू होता.
>चौघांचा शोध अद्याप सुरूच
वाशी येथून भाड्याच्या कारने ही टोळी रिजवानसह वर्तकनगर येथे आल्यानंतर त्यांनी त्यातील ५० हजार रुपये तसेच आदल्या दिवशीचे १० हजार रुपये कोणाला दिले, याचाही शोध सुरूच आहे. दरम्यान, वैरागड आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी या दोघांनाही शनिवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. रिक्षाचालक, साहेलची मैत्रीण आणि अन्य दोघे अशा चौघांचाही अद्याप शोध सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Complaint against trader made for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.