दिवा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: गावठी दारुसह पाच लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:39 PM2018-02-02T19:39:34+5:302018-02-02T19:55:14+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी आणि भरारी पथकाने दिव्यातील खाडी किनारी शुक्रवारी धाड टाकून एका बोटीसह गावठी दारु तसेच दारु निर्मितीच्या रसायनासह सामुग्री जप्त केली.

 In the city of Diva, the state excise department seized the property worth Rs five lakh along with an ammunition | दिवा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: गावठी दारुसह पाच लाखांचा ऐवज जप्त

दिवा भागातील खाडी किनारी कारवाई

Next
ठळक मुद्दे दिवा भागातील खाडी किनारी कारवाईदारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह ५ लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त१६४५ लीटर गावठी दारुसह बोटही हस्तगत

ठाणे : दिवा गावातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘डी’ विभागासह ठाण्याच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या शुक्रवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह पाच लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील , पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर तसेच जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे तसेच भरारी पथकाचे निरीक्षक संजय कांगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, जवान के. एस. वाजे आणि जी. के. तेलुरे आदींच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी रोजी दिवा गावातील खाडी भागात बेकायदेशीरपणे चालणा-या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या वेगवेगळया तीन अड्डयांवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धाडसत्र राबविले. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे ७८ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे २८ प्लास्टीकचे ड्रम, गावठी दारुने भरलेले ३५ लीटर क्षमतेचे ४७ प्लास्टीकचे ड्रम, एक होडी, रसायनाने भरलेला एक मोठा ढोल एक सतेले आणि एक मोटर इंजिन जप्त तसेच एक हजार ६४५ लीटर गावठी दारु आणि १५ हजार ६०० लीटर दारु निर्मितीचे रसायन असा सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. धाडीची चाहूल लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणा-या चौघांनी पलायन केले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
..................
आठवडा भरात दुसरी कारवाई
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने आठवडाभरापूर्वीच २९ जानेवारी रोजी डायघर भागातील देसाई गावातील खाडी किनारी धाड टाकून दारु निर्मितीसाठी लागणाºया रसायनासह चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शुक्रवारच्या कारवाईने दारुचा अड्डा चालविणाºयांचे मात्र चांगलेच दाबे दणाणले आहेत.

Web Title:  In the city of Diva, the state excise department seized the property worth Rs five lakh along with an ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.