चाकरमानी निघालेत गावाक! यंदा बस वाढल्या!, गणेशोत्सवासाठी ८३० बसेसचे बुकिंग : ग्रुप बुकिंग फुल्ल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:42 AM2017-08-21T06:42:53+5:302017-08-21T06:43:31+5:30

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८६० एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील आतापर्यंत ८३० एसटी बसचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

 Chatakarmi leaving the village! Bus boosts for 830 buses for Ganeshotsav: Group booking facility | चाकरमानी निघालेत गावाक! यंदा बस वाढल्या!, गणेशोत्सवासाठी ८३० बसेसचे बुकिंग : ग्रुप बुकिंग फुल्ल  

चाकरमानी निघालेत गावाक! यंदा बस वाढल्या!, गणेशोत्सवासाठी ८३० बसेसचे बुकिंग : ग्रुप बुकिंग फुल्ल  

Next

ठाणे : गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८६० एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील आतापर्यंत ८३० एसटी बसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ४४० बस या ग्रुपद्वारे हाऊस फुल्ल झाल्या आहेत. गतवर्षापेक्षा यंदा सोडण्यात येणाऱ्या बसची संख्या २५ ने वाढली असून गर्दी झाल्यास आणखीन बस सोडण्यात येतील, असे महामंडळाने म्हटले आहे.
रविवारी कोकणात चाकरमान्यांच्या दोन बस सुटल्या. त्यामुळे चाकरमानी निघालेत गावाक ! असेच म्हणावे लागणार आहे. याचदरम्यान, सोशल मिडियावरही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहनांचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहागर, दापोली, खेड, चिपळूण येथे जाणाºया भक्तांकरिता दरवर्षीप्रमाणे, यंदाही ठाणे विभागातील ८ डेपोमधून ८६० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या ८ डेपोतून २० ते २४ आॅगस्टदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले. तसेच ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण सुरू करून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्यास सांगितले होते. तसेच गावाहून परतताना काही गोंधळ होऊ नये म्हणून परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. परतीचा प्रवास हा १ ते ५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे.
सर्वाधिक एसटी बोरिवलीहून
यंदा सर्वाधिक २८० एसटी बोरीवली येथून सोडण्यात येणार आहेत. त्या पाठोपाठ १८४ ठाणे खोपट, विठ्ठलवाडी-१४०, भांडूप -११३, कल्याण-६१, भार्इंदर-२२ आणि मुलूंड -३० अशा ८६० गाड्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी ८३० गाड्यांचे बुकिंग झाले असून त्यांचे आॅनलाईन ३९० तर ४४० गाड्यांचे ग्रुपद्वारे बुकिंग झाले आहे.
सुटणाºया एसटी
२० आॅगस्टपासून चाकरमानी गावाक जाण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २३ आॅगस्टला सर्वाधिक ५६० बस ठाणे १-२ ,कल्याण, विठ्ठलवाडी या चार डेपोतून सुटणार आहेत. त्यापाठोपाठ २४ आॅगस्ट रोजी १३०, २२ आॅगस्टला १२३ आणि २१ आॅगस्ट रोजी १५ एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सोशल मिडियावरून आवाहन
आपण आपल्या परिवारासह गौरी-गणपतीच्या सणाला मुंबई गोवा महामार्गावरून खाजगी किंवा सरकारी वाहनाने प्रवास करणार असाल तर जेवढ शक्य होईल तेवढे लवकर निघण्याचा प्रयत्न करा. वाहन चालवताना गाडीचा ड्रायव्हर कोणत्याही प्रकारचे मद्यपान करत असेल तर त्याला आपण सुचना करा, की मद्यपान करू नये. तसेच डुलक्या खात असेल तर त्याला गाडी बाजूला लावायला सांगणे. आपल्याला उशिर होत आहे म्हणून वेगावर नियंत्रण न ठेवता वाहन चालवत असेल तर त्याला समज देणे, की आम्हाला कोणत्याही प्रकारची घाई नाही, कृपया गाडी सावकाश चालव.
महामार्गावरून जात असताना आपल्या पुढे एकेरी लाईन मध्ये काही वाहने उभी असल्यास आपले वाहन त्याच लाईन मध्ये उभे करून ट्रॅफिकला सहकार्य करावे, एखादा अपघात झाला असेल तर ताबडतोब मदतीला हात पुढे करणे. विनाकारण विरूद्ध दिशेने वाहन चालवून समोरच्या वाहनांचा खोळंबा करू नये आणि ट्रॅफिकला कारणीभूत होऊ नये.
दुसरा विरूद्ध दिशेने गेला म्हणजे आपल्याला जाणे गरजेचे नाही एकामागून एक अशा शंभर गाड्या विरु द्ध दिशेने गेल्या तर आपण गणपती विसर्जन करायला पोहोचणार हे नक्की. सर्वप्रथम आपण शिस्तीने वाहन चालवा आणि कोणी शिस्तभंग करत असेल तर त्याला ही तसे समजावून सांगा. महामार्गावरील पोलीस बांधव आपल्यासाठी सणवार सोडून, आपण गणपतीला कसे लवकर पोहोचू शकता, याच्यासाठी प्रयत्न करत असतात. तेव्हा त्यांना सहकार्य करा, असे सोशल मिडियावरुन करण्यात येत आहे.

बाप्पाला नैवेद्य व्हरायटी मोदकांचा : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी साडेचार किलोंचा मोदक

ठाणे : यंदा गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकांमध्ये आकर्षक प्रकार आले आहे. काजू गुलाबकंद मोदक, खस मोदक, केवडा मोदक यासारखे अनेक नावीन्यपूर्ण मोदक मिठाईच्या दुकानांत पाहायला मिळत आहे. मोदक जास्त वेळ टिकावे, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कडक बुंदीपासून बनवलेले जम्बो मोदकही तयार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. मंडपांपासून सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. पेढ्यांमध्ये पारंपरिकपणा असला, तरी मोदकांमध्ये नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत.

जायफळ, केशरी, केशर मलाई, फळांच्या फ्लेव्हरमध्ये मँगो, स्ट्रॉबेरी, पाइनाप्पल, कंदी मोदक, मलाई फ्लेव्हर्समध्ये मलाई अंजीर, मलाई पिस्ता, चॉकलेट मलाई, यातही फळांच्या फ्लेव्हर्समध्ये मँगो मलाई, स्ट्रॉबेरी मलाई मोदक हे प्रकार यंदा आहेत. यात हापूस पल्पपासून बनवण्यात आलेला आंबा मावा मोदक नव्याने आला असल्याचे दुकानमालक केदार जोशी यांनी सांगितले. कळसाच्या प्रकारचे कडक बुंदीचे मोदकही नव्याने पाहायला मिळत आहे. कडक बुंदीचे लाडू, मोतीचूर लाडू, तूप व तेलामधील कळीच्या बुंदीचे लाडूदेखील आहेत.

श्रीखंड, बासुंदी, बंगाली मिठाईदेखील यानिमित्ताने गणेशभक्त खरेदी करतात. श्रीखंडामध्ये केशर, मँगो, ड्रायफ्रुट्स हे प्रकार आहेत. पेढ्यांमध्ये नेहमीप्रमाणे पारंपरिक प्रकार आहेत. वेलची, जायफळ, कंदी, केशरी, केसर मलाई, बांगडी पेढी, त्यातही मलाई आणि केसर मलाई हे प्रकार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कडक बुंदीचे दोन किलो आणि साडेचार किलोचे मोदक तयार केले आहेत. हे मोदक जास्त वेळ टिकावे, या उद्देशाने तयार केले जात असल्याचे जोशी यांनी सांगितले. अशाप्रकारच्या नवीन गोष्टींना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच त्यांना याची उत्सुकता आहे.

माव्यामध्येही जम्बो प्रकार आले असून नारळ आणि कांद्याच्या आकाराचे मोदक आहेत. गौरीसाठी नारळ, गूळ, खोबºयाच्या करंजाप्रमाणे माव्याच्या नवीन करंज्या आल्या आहेत. बाहेरगावी कडक लाडू, कडक मोदक, करंज्या गेल्या आहेत. स्थानिकांसाठी दोन दिवस आधी माव्याचे मोदक, पेढे उपलब्ध केले जातील, असे दुकानमालकांनी सांगितले.
याशिवाय मोदकांचे इतर रंगीबेरंगी प्रकार, सजावट केलेले मोदकही मागणीनुसार उपलब्ध आहेत. उत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर माव्याच्या मिठाईतील व्हरायटी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title:  Chatakarmi leaving the village! Bus boosts for 830 buses for Ganeshotsav: Group booking facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.