जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:28 AM2018-05-11T06:28:28+5:302018-05-11T06:28:28+5:30

ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

CCTV cameras watch at Pumphouse along with water consoles | जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

Next

ठाणे - ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बसवण्यात येणाºया कॅमेºयांमुळे पाणीवितरण केंद्रावर एखादा घातपाताचा प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेने ही खबरदारी घेतली आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे. ठामपामार्फत ठाणेकरांना रोज ४८० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २०० दशलक्ष लीटर, मुंबई महापालिकेकडून ६०, एमआयडीसीकडून ११०, स्टेम प्राधिकरणाकडून ११० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. निवासी आणि झोपडपट्टी भागात प्रतिव्यक्तीमागे १३५ लीटर प्रतिदिन, तर व्यावसायिक आणि इतर भागात २१० लीटर प्रतिदिन याप्रमाणे शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराच्या विविध भागांत ५६ जलकुंभ आणि १७ पंपहाउस असून येथूनच शहरातील पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे ते नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. असे असले तरी पाणीवितरण व्यवस्थेच्या या महत्त्वाच्या केंद्रांवर पुरेसे सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरामध्ये घातपात घडवण्यासाठी जलकुंभ आणि पंप हाउसमधील पाण्याचा वापर होऊ शकतो, असा मुद्दा काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत चर्चेत आला होता. नेमकी ही बाब लक्षात घेऊन जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे शहराच्या विविध भागांतील या जलकुंभ आणि पंपहाउसवर बसवण्यात येणाºया सीसीटीव्ही कॅमेºयांसाठी माजिवडा नागरी संशोधन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या कक्षात २०० कॅमेरे जोडण्यात येणार आहेत. त्याद्वारे पाणीवितरण केंद्रावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

घातपातासाठी जलकुंभातील पाण्याचा वापर?'

शहरामध्ये घातपात घडवण्यासाठी जलकुंभ आणि पंप हाउसमधील पाण्याचा वापर होऊ शकतो, असा मुद्दा काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत चर्चेत आला होता. नेमकी ही बाब लक्षात घेऊन जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: CCTV cameras watch at Pumphouse along with water consoles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.